आयजीपी सुनील गर्ग, अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना राष्ट्रपती पदक

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:04+5:302015-08-14T23:35:04+5:30

पणजी : पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

IGP Sunil Garg, Superintendent Bosco George, President's Medal | आयजीपी सुनील गर्ग, अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना राष्ट्रपती पदक

आयजीपी सुनील गर्ग, अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना राष्ट्रपती पदक

जी : पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
1992 साली आयपीएस सेवेत रुजू झालेले गर्ग हे एक वर्षापूर्वी गोव्यात आयजीपी म्हणून आले. दिल्लीत त्यांची बेकायदा दारू विरुद्धची कारवाई गाजली. खंडणी व अपहरण प्रकरणातही त्यांनी दिल्लीत यशस्वी तपास केला. 1 सप्टेंबर 2014 रोजी गर्ग यांनी गोव्यात ताबा घेतला.
पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ते सध्या लाच-लुचपतविरोधी विभागात आहेत. 2007 साली त्यांना मुख्यमंत्री पोलीस पदक मिळाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: IGP Sunil Garg, Superintendent Bosco George, President's Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.