शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

कोरोना संकटात पीएफ काढताय? रिजेक्ट न होण्यासाठी या पाच चुका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:17 AM

जेव्हा तुम्ही ईपीएफओकडे पीएफ काढण्यासाठी अर्ज करता तेव्हा EPFO कडून काही गोष्टींची पडताळणी केली जाते. त्यानंतरच रक्कम ट्रान्सफर केली जाते.

कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकरने पीएफ काढण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र, असे असले तरीही तुम्ही केलेला अर्ज नाकारला जाऊ शकतो. यामुळे गरजेच्या वेळी खूप महत्वाची असलेली रक्कम न मिळाल्याने अडचणी वाढू शकतात. यासाठी या पाच चुका टाळाव्या किंवा दुरुस्त कराव्या लागणार आहेत. जेव्हा तुम्ही ईपीएफओकडे पीएफ काढण्यासाठी अर्ज करता तेव्हा EPFO कडून काही गोष्टींची पडताळणी केली जाते. त्यानंतरच रक्कम ट्रान्सफर केली जाते. मात्र, या गोष्टीच जर चुकीच्या किंवा अर्धवट भरलेल्या असतील तर १०० टक्के तुमचा अर्ज फेटाळला जातो. चला जाणून घेउया या पाच गोष्टी ज्यामुळे क्लेम रिजेक्ट होण्याची दाट शक्यता असते.

बँक अकाऊंटईपीएफओकडे अर्ज करताना तुमच्या पीएफ खात्याला जो बँकेचा खाते नंबर दिला आहे, तोच लिहावा. अन्यथा तुमचा क्लेम रिजेक्ट होतो. जर बँक खाते क्रमांक चुकीचा  आढळला तर पैसे दिले जात नाहीत. यासाठी तुमच्या कंपनीशी संपर्क साधून तुमचा बँक खाते क्रमांक बदलून घ्यावा. हा खाते क्रमांक ईपीएफओ कंपनीकडून व्हेरिफाय करून घेते. तसेच बँकेचा आयएफएससी क्रमांकही योग्य असायला हवा. अनेकदा आपण चांगल्या संधीसाठी कंपनी बदलत असतो. यामुळे युएएन एकच असतो, परंतू कंपनीची पगार जमा होणारी बँक वेगळी असल्याने जुन्या कंपनीचे बँक खाते वापरात नसते. बरीच वर्षे वापरात नसल्यास ते खाते बंद केले जाते. यामुळे मोठी अडचण होऊ शकते. यामुळे बँकेचा खाते क्रमांक वेळोवेळी पीएफओकडे अपडेट करावा. 

केवाय़सीईपीएफ क्लेम रिजेक्ट होण्याचे दुसरे मह्त्वाचे कारण म्हणजे केवायसी अर्धवट असणे आहे. तुमचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक जर अर्धवट असेल तर ईपीएफ अर्ज बाद करतो. जरी तुम्ही तुमचे कागदपत्र पीएफ वेबसाईटवर जमा केलेले असले तरीही ते व्हेरिफाईड नसतात. हे व्हेरिफाय करण्याचे काम ईपीएफओ तुमच्या कंपनीकडे पाठविते. याची पडताळणी तुम्ही मेंबर ई-सेवा खात्यामध्ये लॉगईन करून करू शकता. जर तुम्ही पाच वर्षांपेक्षा कमी नोकरी केली असेल तर पीएफ सेटलमेंटसाठी तुम्हाला पॅन कार्डची माहिती देणे आवश्यक आहे. 

जन्म तारीखअनेकदा पीएफ खात्यावर एक आणि तुम्ही दिलेल्या अर्जावर किंवा कागदपत्रांवर दुसरी जन्म तारीख असते. बऱ्याचजणांचा हा घोळ होतो. कारण आपल्याकडे ६ व्या वर्षी शाळेत घातले जात असल्याने ते अॅडजस्ट करण्यासाठी लहानपणी अनेकांची जन्मतारीख बदललेली असते. यामुळेही क्लेम रिजेक्ट होतो. यासाठी पहिल्यापासून एकच जन्मतारीख कागदपत्रांवर ठेवणे गरजेचे असते. ईपीएफओने ३ एप्रिलला एक नियम बनविला आहे. यामध्ये आता पीएफ खातेधारक एका वर्षाऐवजी जन्म तारीख तीन वर्षे मागे पुढे दुरुस्त करू शकतात. 

UAN आधार लिंकिंगजर तुम्ही कोरोनामुळे मिळालेल्या योजनेचा फायदा घेत असाल तर तुमचे आधार कार्ड पीएफ युएएन नंबरशी लिंक होणे गरजेचे आहे. जर लिंक नसेल तर ईपीएफ विड्रॉवल क्लेम रिजेक्ट होतो. युएएनला आधार लिंक करण्याचे चार पर्याय आहेत. यापैकी कोणताही पर्याय तुम्ही वापरू शकता. 

अटी अपूर्णजर कोणी ईपीएफ खातेधारक कोरोनाच्या संकटामुळे पीएफ काढणार असेल तर त्याने तीन अटी पूर्ण करायला हव्यात. पहिले त्याच्या युएएन अॅक्टिव्हेट झालेला असायला हवा. दुसरी आधार व्हेरिफाय झालेले असायला हवे, तसेच लिंकही केलेले हवे. तिसरी अट म्हणजे आयएफएससी सोबत बँक खाते युएएनला लिंक केलेले हवे. 

 

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चीनने आधी 'मारले', आता औषध देण्याची तयारी; जगाच्या भल्यासाठी घेतले दोन मोठे निर्णय

तुम्ही कोणत्या झोनमध्ये? राज्यात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

बापरे! १०८ मेगापिक्सलचा Motorola Edge+ लाँच; लगेचच 15000 चा डिस्काऊंट

मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु

CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीcorona virusकोरोना वायरस बातम्या