शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

दार्जिलिंगमध्ये राहायचं असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर राहा

By admin | Published: June 13, 2017 4:37 PM

दार्जिलिंगमध्ये राहायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर राहा असा इशारा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पर्यटकांना दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

 

दार्जिलिंग, दि.13- दार्जिलिंगमध्ये राहायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर राहा असा इशारा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पर्यटकांना दिला आहे. गोरखा जनमुक्तीचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी याबाबत बोलताना सांगितले, "इथली स्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे,  येथे काहीही घडू शकते. त्यामुळे पर्यटकांनी दार्जिलिंग सोडावे असे माझे  सांगणे आहे, तरिही ते येथे राहणार असतील त्यांनी स्वतःच्याच जबाबदारीवर राहावे."

दुसऱ्या दिवशीही गोरखा जनमुक्तीच्या सदस्यांनी सरकारी कार्यालये व इतर आस्थापने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला. गेले दोन दिवस या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यालये बंद करायला लावणाऱ्या गोरखा जनमुक्तीच्या सदस्यांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोरखा जनमुक्तीच्या सदस्यांनी चौकबाझार परिसरात एकत्र येऊन स्वतंत्र गोरखा राज्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत लोकांना काम करण्यापासून रोखले. या सदस्यांना अटकाव करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही त्यांनी दगडफेक केली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत गर्दीला हटवले. गोरखा जनमुक्तीच्या या आंदोलनामुळे संपुर्ण परिसराची वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. गोरखा जनमुक्तीच्या आंदोलकाबरोबर चहाच्या मळ्यातील मजूरांनीही आंदोलनात सहभाग घेतलेला आहे.
     दार्जिलिंगमधील स्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे येथील दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्याइतकी सामान्य परिस्थिती येण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. मात्र अजूनही पश्चिम बंगाल सरकारडून दार्जिलिंगच्या परिस्थितीचा अहवाल प्राप्त झालेला नाही असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.