शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

तर खुल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सामोरे जा, शत्रुघ्न सिन्हांचे मोदींना आव्हान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 22:28 IST

माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशात राबवण्यात येत असलेल्या आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता भाजपाच्या अजून एका ज्येष्ठ नेत्याने मोदींवर टीकास्र सोडले आहे.

नवी दिल्ली - माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशात राबवण्यात येत असलेल्या आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता भाजपाच्या अजून एका ज्येष्ठ नेत्याने मोदींवर टीकास्र सोडले आहे. मोदींनी समोर येत प्रसारमाध्यमांना सामोरे जाऊन प्रश्नांची खुलेपणाने उत्तरे देण्याची वेळ आली आहे, असे आव्हान भाजपाचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींना दिले आहे.  शत्रुघ्न सिन्हा म्हणाले," आपण मध्यमवर्गीय, निर्यातक, लहान व्यापारी, तसेच संपूर्ण देश विशेषकरून गुजरातमधील नागरिकांची चिंता करतो, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी दाखवले पाहिजे." यशवंत सिन्हा यांनी केलेल्या टिप्पणीला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शेलक्या शब्दात दिलेल्या उत्तरानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी हे वक्तव्य केले आहे.   यशवंत सिन्हा यांच्यावर टीका करणाऱ्या अरुण जेटलींचा शत्रुघ्न सिन्हा यांनी परखड शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, "देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत यशवंत सिन्हा यांच्या निरीक्षणाचे मी आणि माझ्याप्रमाणे विचार असणारे अनेक नेते जोरदार समर्थन करतो. पक्ष आणि पक्षाबाहेरील लोकांनीही त्यांच्या विचारांचे समर्थन केले आहे. येत्या काही दिवसांत नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणार आहे." अगोदरच्या सरकारला आपण दोष देऊ शकत नाही, कारण आपल्याला पुरेपूर संधी मिळाली आहे, असे सांगत यशवंत सिन्हा यांनी भाजपा सरकारला सुनावले होते. 'अर्थव्यवस्था कमकुवत असताना नोटाबंदीचा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती. अजून नोटाबंदीचे परिणाम समोर आले नसताना जीएसटी लागू करणे दुसरा धक्का होता', अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली.  एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं यशवंत सिन्हा यांनी सांगितले होते. 'अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे यामध्ये काही दुमत नाही. आम्ही नेहमी युपीएला जबाबदार धरत होतो. मात्र आता जेव्हा सत्तेत येऊन 40 महिने झाले आहेत, त्यानंतरही आधीच्या सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही', असे खडे बोल यशवंत सिन्हा यांनी सुनावले होते.त्यानंतर  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना उत्तर देताना 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत अशी खोचक टीका केली होती. यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज आहेत त्या ठिकाणी नसते असे म्हटले होते. देशाची अर्थव्यवस्था ढासळत असल्याला अरुण जेटली जबाबदार आहेत, असं यशवंत सिन्हा बोलले होते. उत्तर देताना अरुण जेटली बोलले होते की, 'यशवंत सिन्हा 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत. मी अद्याप तरी अशा स्थितीत नाही की माजी अर्थमंत्री म्हणून वृत्तपत्रात लेख लिहीन'.  

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपा