मी दोषी आहे असे वाटत असेल तर चौकशीचे आदेश द्यावेत - राहूल गांधी

By Admin | Updated: November 19, 2015 18:33 IST2015-11-19T16:26:21+5:302015-11-19T18:33:47+5:30

जर मी दोषी आहे अस वाटतंय तर माझ्या विरेधात चौकशीचे आदेश द्यावेत, चौकशी मध्ये जर मी दोषी अढळलो तर मला तरुगांत पाठवावे, मी कोणालाही घाबरत नाही असे राहूल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले

If you think that I am guilty, then order an inquiry - Rahul Gandhi | मी दोषी आहे असे वाटत असेल तर चौकशीचे आदेश द्यावेत - राहूल गांधी

मी दोषी आहे असे वाटत असेल तर चौकशीचे आदेश द्यावेत - राहूल गांधी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ - जर मी दोषी आहे अस वाटतंय तर माझ्या विरेधात चौकशीचे आदेश द्यावेत, चौकशी मध्ये जर मी दोषी अढळलो तर मला तरुगांत पाठवावे, मी कोणालाही घाबरत नाही असे राहूल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले.  भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ९८व्या जयंती निमीत्त यूथ कांग्रेसने 'माँ तुझे सलाम'  हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात राहूल भाषण देत होते. भाजपाचे सुब्रमण्य स्वामींनी राहूल गांधींनी ब्रिटनमध्ये कागदपत्रांमध्ये आपण ब्रिटिश नागरीक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या व्यक्तव्याचा राहूल गांधीने खरपूस समाचार घेतला. भाजपा व आरएसएस माझ्या परीवाराला बदनाम करत आहेत, परंतु मी त्यांना घाबरत नाही. मी पाठीमागे नाही सरणार, भारतासाठी लढत आहे, गरीब, मजदूर, शेतकऱ्यासाठी लढत आहे असेही राहूल गांधी म्हणाले.
युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसला भविष्यातील चांगले नेते मिळत आहेत, आणि तो त्यांच्यासाठी एक मंच तयार होत आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या

Web Title: If you think that I am guilty, then order an inquiry - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.