शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोणाकोणाला भेटलात, हजार लोकांची यादी द्या! भाजपने खासदार, मंत्र्यांना दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 07:50 IST

मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपने ३० मे ते ३० जूनपर्यंत देशभरात जनसंपर्क अभियान सुरू करण्याची घोषणा केली होती.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पार्टीच्या खासदारांकडे पक्ष नेतृत्वाने जनसंपर्क अभियानांतर्गत भेटलेल्या एक हजार लोकांच्या नावांची यादी मागितली आहे. त्याचबरोबर २५ जून रोजी आणीबाणीची आठवण लोकांना देण्यासाठी आणीबाणीच्या काळात करण्यात आलेल्या अत्याचारावरील चित्रपट जनतेला दाखवण्यास सांगितले आहे.

मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपने ३० मे ते ३० जूनपर्यंत देशभरात जनसंपर्क अभियान सुरू करण्याची घोषणा केली होती. हे अभियान समाप्त होण्याच्या आठ दिवस आधीच भाजप खासदार व केंद्रीय मंत्र्यांना हिशेब मागितला जात आहे. त्यांनी या कालावधीत समाजातील कोणत्या एक हजार प्रभावशाली प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधला, याबाबत माहिती विचारण्यात आली आहे.आणीबाणीची आठवण देण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांत भाजप खासदार, नेत्यांना आणीबाणीत झालेल्या अत्याचारावरील चित्रपट दाखविण्यास सांगण्यात आले आहे. 

पंतप्रधान २७ रोजी व्हर्च्युअल संवाद साधणार- भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सर्व खासदार, केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी एक हजार लोकांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. - या अभियानाचे अपयश पाहता, भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्र्यांनी संपर्क साधलेल्या एक हजार लोकांची यादी मागण्यात आली आहे. - भाजपच्या देशभरातील बुथ कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जून रोजी व्हर्च्युअल संवाद साधणार आहेत. - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवड झालेल्या सोशल मीडियाला प्रभावित करणाऱ्या तीन हजार कार्यकर्त्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. - हा व्हर्च्युअल संवाद पाहण्यासाठी भाजपच्या १५ हजार मंडळांत स्क्रीन लावला जाईल. तेथे भाजप खासदार, आमदार व नेत्यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपा