लाच दिली तर मारुन टाकीन - तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची धमकी
By Admin | Updated: January 12, 2015 10:47 IST2015-01-12T10:46:57+5:302015-01-12T10:47:14+5:30
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच ठेवले असून अधिका-यांना लाच दिली तर मारुन टाकीन अशी धमकीच चंद्रशेखर राव यांनी दिली आहे

लाच दिली तर मारुन टाकीन - तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची धमकी
ऑनलाइन लोकमत
वारंगल, दि. १२ - तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच ठेवली असून अधिका-यांना लाच दिली तर मारुन टाकीन अशी धमकीच चंद्रशेखर राव यांनी दिली आहे. अधिका-यांनी लाच मागितली तर आम्हाला संपर्क करा आम्ही त्यांच्यावर कारवाई करु असे त्यांनी सांगितले.
तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी रविवारी लक्ष्मीपूरम येथील झोपडपट्टीवासीयांच्या गृहसंकुलाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमात भ्रष्टाचाराविरोधात बोलताना राव यांची जीभ घसरली. पक्के घर मिळवण्यासाठी नागरिकांना लाच द्यावी लागणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले खरे पण त्यानंतर बोलताना त्यांचा तोल गेला. पक्क्या घरासाठी जर तुम्ही अधिका-यांना लाच दिली तर तुम्हाला मारुन टाकीन असे ते म्हणाले . तेलंगणमधील लक्ष्मीनगर, अमीरनगर, गांधीनगर, प्रशांतनगर, आंबेडकर नगर, जितेंद्रनगर, एस आर नगर या भागांमधील झोपडपट्टींसाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत सुमारे चार हजार घरं बांधली जाणार आहेत.