पास करा नाहीतर आत्महत्या करेन, सलग २० वर्ष नापास होणाऱ्या विद्यार्थाची मुख्याध्यापकास धमकी
By Admin | Updated: February 23, 2016 19:12 IST2016-02-23T19:12:29+5:302016-02-23T19:12:29+5:30
गेली 20 वर्षे वैद्यकीय शाखेमध्ये दुस-या वर्षी नापास होत असलेल्या 52 वर्षांच्या एका व्यक्तिने अखेर पास करा नाहीतर आत्महत्या करतो अशी धमकी मुख्याध्यापकांना दिली आहे.

पास करा नाहीतर आत्महत्या करेन, सलग २० वर्ष नापास होणाऱ्या विद्यार्थाची मुख्याध्यापकास धमकी
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 23 - गेली 20 वर्षे वैद्यकीय शाखेमध्ये दुस-या वर्षी नापास होत असलेल्या 52 वर्षांच्या एका व्यक्तिने अखेर पास करा नाहीतर आत्महत्या करतो अशी धमकी मुख्याध्यापकांना दिली आहे. ईटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दरभंगा मेडिकल कॉलेजमधल्या कपिल देव चौधरीची ही कथा आहे.
1995 मध्ये कपिलने एमबीबीएससाटी प्रवेश घेतला. परंतु, दुस-या वर्षाच्या पुढे काही त्याची झेप जाईना. प्रत्येकवेळी परीक्षा झाली की कपिल मुख्याध्यापकांना मेसेज करायचा की, मला पास करा. परंतु त्याच्या मागणीकडे मुख्याध्यापकांनी लक्ष दिले नाही. अखेर विमनस्क अवस्थेतल्या कपिलने पास न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.
कपिलनं यावेळच्या मेसेजमध्ये लिहिलंय, मला डॉक्टर होऊन देशाची सेवा करायची आहे. त्यामुळे त्यांनी मला परीक्षेत करावं. जर मला पास केलंत तर देवही तुमचं भलं करेल असंही त्यानं मुख्याध्यापकांना उद्देशून म्हटलंय. तसंच आपण दलित असल्यामुळे पास करण्यात येत नाहीये असा ठपकाही त्यानं ठेवलाय.
ज्यावेळी त्याच्या मेसेजचा काहीही फायदा झाला नाही, त्यावेळी त्याने आत्महत्येची धमकी दिली आहे. पोलीसांनी कपिलच्य़ा विरोधात गुन्हा नोंदला असून पुढील तपास सुरू आहे.