धर्मांतर आवडत नसेल तर धर्मांतरबंदीचा कायदा आणा मोहन भागवत : भरकटल्यांना परत आणणे आमचे कर्तव्य
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:23+5:302014-12-20T22:27:23+5:30
कोलकाता : धर्मांतराच्या मुद्यावर भाजपाप्रणीत रालोआ सरकारवर विरोधकांकडून चहूबाजूंनी टीका होत असताना, शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या वादात उडी घेतली़ धर्मांतर आवडत नसेल तर संसदेत धर्मांतरबंदीचा कायदा आणण्यास मदत करा़ पण आमचे हिंदू समाज बनविण्याचे प्रयत्न आहेत आणि अशास्थितीत भरकटलेल्यांना परत आणणे आमचे कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले़

धर्मांतर आवडत नसेल तर धर्मांतरबंदीचा कायदा आणा मोहन भागवत : भरकटल्यांना परत आणणे आमचे कर्तव्य
क लकाता : धर्मांतराच्या मुद्यावर भाजपाप्रणीत रालोआ सरकारवर विरोधकांकडून चहूबाजूंनी टीका होत असताना, शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या वादात उडी घेतली़ धर्मांतर आवडत नसेल तर संसदेत धर्मांतरबंदीचा कायदा आणण्यास मदत करा़ पण आमचे हिंदू समाज बनविण्याचे प्रयत्न आहेत आणि अशास्थितीत भरकटलेल्यांना परत आणणे आमचे कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले़ येथील एका हिंदू संमेलनात भागवत बोलत होते़ एखादी व्यक्ती हिंदू बनू इच्छित नाही, हे समजण्यासारखे आहे़ याचप्रमाणे हिंदूंचेही धर्मांतर व्हायला नको़ आम्हाला हिंदू समाज साकारायचा आहे़ जे हिंदू धर्माबाहेर गेलेत, ते स्वत:हून गेलेले नाहीत तर त्यांना आमिषे दाखवून बळजबरीने त्यांचे धर्मांतर करण्यात आले़ पण आता हिंदू जागा होतोय़ आता कुणालाही घाबरण्याची गरज नाही़ हा आपला देश आहे़ आपले हिंदू राष्ट्र आहे़ एकही हिंदू आपली भूमी सोडून जाणार नाही़ आधी आम्ही जे काही गमावले ते परत आणण्याचे प्रयत्न आपण करू. भरकटलेल्यांना परत आणणे आपले कर्तव्य आहे, असे भागवत यांनी यावेळी ठणकावून सांगितले़ बांगलादेश वा पाकिस्तानकडून होणारे गुन्हे हिंदू सहन करीत आहेत़ पण आमचे देवदेवता सांगतात, शंभर गुन्ह्यांनंतरचा हिंदूंविरुद्धचा एकही गुन्हा सहन करू नका़ फाळणीपूर्वी पाकिस्तानही भारताचे अंग होते़ पाकिस्तानात मोठ्या संख्येत हिंदू नाहीत़ त्याचमुळे पाकिस्तानात शांती नांदू शकली नाही़ भारतातही जोपर्यंत हिंदू आहेत, तोपर्यंत हा देश आहे़ येथे हिंदू नसते तर येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दु:ख, वेदना आणि कष्ट भोगले असते, असेही ते म्हणाले़ हिंदूंच्या उत्कर्षाने कुणालाही घाबरण्याची गरज नाही़ जे कुणी हिंदूंच्या उत्कर्षाविरुद्ध आवाज काढत आहेत, ते स्वार्थी आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला़