शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डीपफेक कराल तर दंडासह आता तुरुंगाचीही हवा खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:00 IST

सरकार कठोर कायदा, नियामक आणणार; बैठकीत घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

संजय शर्मानवी दिल्ली : डीपफेक रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन आणि कठोर कायदा आणणार आहे. पुढील काही महिन्यांमध्येच केंद्र सरकार याबाबत नियामक आणणार आहे. सर्वसामान्य जनतेकडूनही याबाबत सूचना मागवण्यासाठी सरकार एक प्लॅटफॉर्म जारी करणार आहे.

केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी डीपफेकबाबत इंटरनेटच्या सर्व प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी, नॉस्कॉम, एआय तज्ज्ञ, आयआयटी प्रोफेसर यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच नियामक घेऊन जनतेत जाणार आहे. यासाठी आजपासूनच काम सुरू करण्यात आले आहे. पुढील १० दिवसांत नियामक तयार होणार आहेत. त्यानंतर विद्यमान कायद्यांमध्ये बदल करणे अथवा नवीन कायदा आणण्याच्या पर्यायांवर निर्णय घेतला जाणार जाईल. 

सामाजिक धोकाही...nअश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, डीपफेक लोकशाहीसाठी धोकादायक आहे. कोणाचाही आवाज व त्याचा जशाच्या तसा व्हिडीओ जारी करण्याने सामाजिक धोकाही झाला आहे.nअशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकार कठोर कायदा आणण्याची तयारी करीत आहे. यात मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याबरोबरच कारावासाचाही समावेश आहे.

सिंथेटिक कंटेनडीपफेकला सिंथेटिक कंटेन म्हटले जाते. याचा अर्थ जे वास्तवात नाही ते, असा होतो.

चार मुद्यांवर सहमतीडीपफेकबाबत झालेल्या बैठकीत पुढील चार मुद्यांवर सहमती झालीडिटेक्शन : डीपफेक आहे की नाही हे सर्वांत आधी जाणून घेणेप्रिव्हेन्शन : डीपफेक व्हायरल होण्यापासून रोखणेडीपफेक असेल तर त्याबाबत कुणाकडे, कशी तक्रार करावी? हा प्रकार रोखण्यासाठी जागरूकता वाढवणार. यात मध्यमांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

रश्मिका प्रकरणात  पडताळणी सुरूअभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणाचा तपास करण्यात येत असून, त्याचे धागेदोरे हाती लागले आहेत, असे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले. व्हिडीओ अपलोड केलेल्या सर्व आयपी ॲड्रेसची ओळख पटवली जात आहे. सर्वप्रथम हा व्हिडीओ कोणी अपलोड केला, याची आता माहिती घेतली जात आहे.

पुन्हा बैठक...अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, १० दिवसांनंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नियामक तयार करून अशाच प्रकारची बैठक पुन्हा बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये कायद्याबाबत चर्चा होईल.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCentral Governmentकेंद्र सरकारCrime Newsगुन्हेगारीParliamentसंसद