शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार कराल, तर फासावर लटकाल! २० वर्षांत प्रथमच सर्वाधिक १६५ कैद्यांना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 07:15 IST

Crime News: सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेच्या तरतुदींचा पुन्हा विचार करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतरही, गेल्यावर्षी देशातील अनेक न्यायालयांनी १६५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेच्या तरतुदींचा पुन्हा विचार करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतरही, गेल्यावर्षी देशातील अनेक न्यायालयांनी १६५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या २० वर्षांतील एका वर्षात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही सर्वाधिक संख्या आहे. ज्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली त्यामध्ये सर्वाधिक ५१.२ टक्के लैंगिक अत्याचारात दोषी आढळले आहेत.नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू) दिल्लीच्या गुन्हेगारी सुधारणा वकील गट प्रोजेक्ट ३९-ए जारी केलेल्या सातव्या ‘भारतात मृत्युदंड : वार्षिक सांख्यिकी अहवाला’मध्ये ही बाब समोर आली आहे. 

वाढती संख्या अहवालानुसार, अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील एकाच प्रकरणामुळे ३८ कैद्यांना एकत्रितपणे फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने वर्षभरात सर्वाधिक कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते.

२००४ नंतर फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.

मोठ्या कोर्टांमध्ये ७९ खटलेसर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांमधील फाशीच्या शिक्षेची प्रकरणे निकाली काढण्याबाबत अहवाल सांगतो की, गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने ११, तर उच्च न्यायालयांनी ६८ खटले निकाली काढले. उच्च न्यायालयांनी चार प्रकरणांमध्ये मृत्युदंड शिक्षा जाहीर केली. ३९ प्रकरणांमध्ये ५१ कैद्यांची शिक्षा कमी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयानेही दरोडा प्रकरणाच्या एका खटल्यात जन्मठेपेची शिक्षा फाशीत  बदलली होती.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ