शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सत्तेवर आल्यास मोदी क्रूरकर्मा बनतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:15 IST

ममता बॅनर्जींचा घणाघाती आरोप

माथाभंग (प. बंगाल): आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सत्ता दिली तर मोदी क्रूरकर्मा हुकूमशहा होतील, अशी प्रखर टीका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला.प. बंगालच्या विकासात ममता आणि तृणमूल गतिरोधक आहेत, या मोदींच्या व्यक्तिगत टीकेला ‘यापुढे मी मोदींना पंतप्रधान न म्हणता ‘एक्स्पायरी बाबू (मुदत संपलेला नेता) म्हणेन, असा प्रतिटोला हाणला होता.

कूच बिहार येथील ग्सभेत तोच आक्रमकपणा कायम ठेवत ममता यांनी असाही आरोप केला की, आताही मोदींच्या लुटा, दंगली करा व ठार मारा याच तीन मुख्य घोषणा आहेत. पुन्हा सत्तेवर आल्यास ते राज्यघटना गुंडाळून ठेवतील आणि याहीपेक्षा क्रूरकर्मा हुकुमशहा बनून लोकशाहीला एकाधिकारशाहीत बदलून टाकतील. ममता असेही म्हणाल्या की, चहावाल्याला या देशाने पंतप्रधान केले, असे म्हणून मोदींनी सुरुवातीस भरपूर आत्मस्तुती करून घेतली. पण चहावाल्याला आश्वासने पूर्ण करणे जमले नाही, तेव्हा त्याने ‘मै मी चौकीदार’ ही लोकांना उल्लू बनविण्याची नवी टूम काढली आहे.

निर्वासित करण्याचा डावनागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक हा भारतीय नागरिकांना निर्वासित करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे, असा आरोप करून बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले की, बंगालमध्ये ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’ (एनआरसी)सारखी मोहीम कधीही राबवू दिली जाणार नाही. देशात कोणी राहायचे व कोणी नाही, हे ठरविण्याचा मोदींना काहीही अधिकार नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक