तुमच्यावर बलात्कार झाला तर विरोधी पक्ष काय करणार, भाजपा मंत्र्याचं असंवेदनशील वक्तव्य
By Admin | Updated: October 17, 2015 15:18 IST2015-10-17T15:09:46+5:302015-10-17T15:18:42+5:30
तुमच्यावर बलात्कार केला तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करू शकतो असं अत्यंत असवंदेनशील वक्तव्य के. एस. ईश्वरप्पा यांनी केले महिला पत्रकाराशी बोलताना केले

तुमच्यावर बलात्कार झाला तर विरोधी पक्ष काय करणार, भाजपा मंत्र्याचं असंवेदनशील वक्तव्य
>ऑनलाइन लोकमत
बेंगळुर, दि. १७ - आत्ता तुमचं कुणी अपहरण केलं, नी तुमच्यावर बलात्कार केला तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करू शकतो असं अत्यंत असवंदेनशील वक्तव्य भाजपाच्या कर्नाटकातल्या विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते असलेल्या के. एस. ईश्वरप्पा यांनी केले महिला पत्रकाराशी बोलताना केले आहे. कर्नाटकात घडलेल्या लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनांनंतर ईश्वरप्पांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी काय करण्यात येत आहे, याची विचारणा केली.
मात्र, नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांची जीभ घसरली. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय करत आहेत, हे विचारले असता ईश्वरप्पा असंवेदनशील वक्तव्य करून बसले.
विरोधी पक्ष म्हणून आम्ही काय करायला हवं हेदेखील इश्वरप्पांनी विचारलं आणि आम्हाला जे काही करणं शक्य आहे ते करत आहोत असंते म्हणाले.