शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही खासदार असलात तरी मनमानी करू शकत नाहीत, मनोज तिवारींना सुप्रीम कोर्टाने खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 05:20 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार ईशान्य दिल्लीतील गोकुलपुरी भागातील एका घराला ठोकलेले सील गेल्या रविवारी तोडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांना चांगलेच फैलावर घेतले.

नवी दिल्ली - न्यायालयाच्या आदेशानुसार ईशान्य दिल्लीतील गोकुलपुरी भागातील एका घराला ठोकलेले सील गेल्या रविवारी तोडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांना चांगलेच फैलावर घेतले. तुम्ही खासदार असलात तरी मनाला येईल तसे वागण्याचा परवाना तुम्हाला कोणी दिलेला नाही, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांची कानउघाडणी केली.न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीच्या अनेक भागांतील अनधिकृत बांधकामे व बेकायदा वापर होणाऱ्या जागांना सील ठोेकण्याचे काम सुरू आहे. एका घराला ठोकलेले सील तोडल्याबद्दल न्यायालयाने तिवारी यांना ‘न्यायालयीन अवमान’ कारवाईची (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) नोटीस काढली होती. त्यानुसार खासदार तिवारी ज्येष्ठ वकील विकास सिंग यांच्यासह न्या. मदन बी. लोकूर, न्या. दीपक गुप्ता व न्या. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठापुढे हजर झाले.खासदार तिवारी त्या घराचे सील तोडत असतानाची दृश्ये वृत्तवाहिन्यांवरून दाखविण्यात आली होती. आपल्या कृतीचे समर्थन करताना तिवारी यांनी त्यावेळी वृत्तवाहिन्यांना सांगितले होते की, याच भागात ज्यांना सील ठोकायला हवे, अशा एक हजार अन्य मालमत्ता आहेत; पण त्या सोडून मुद्दाम या घराला ‘टार्गेट’ करून सील ठोकण्यात आले आहे. या विधानाचे समर्थन करताना अ‍ॅड. विकास सिंग म्हणाले की, ज्या घराचे सील खासदार तिवारी यांनी तोडले, त्याचा न्यायालयाने दिलेल्या निकालाशी काही संबंध नव्हता. न्यायालयाची देखरेख समिती प्रसिद्धीसाठी याचा उगीचच गवगवा करीत आहे. खासदार तिवारी यांना आपल्या कृती व उक्तीचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगून खंडपीठाने पुढील सुनावणी ३ आॅक्टोबर रोजी ठेवली.तुम्ही त्याची काळजी करू नकाअ‍ॅड. विकास सिंग यांच्यामार्फत न्यायालयाने खासदार तिवारी यांना सुनावले की, काहीही असले तरी कायदा हाती घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाही. तुम्हाला काही अडचण होती तर तुम्ही ते न्यायालयाच्या निदर्शनास आणू शकला असतात. खासदार असलात तरी तुम्ही मनाला येईल ते काहीही करू शकत नाही.ज्या हजार घरांना सील ठोकले नाहीत, असे तुम्ही म्हणता त्याची काळजी तुम्ही करू नका. त्यांचा तपशील आम्हाला द्या, त्या घरांना सील ठोेकण्यासाठी आम्ही तुम्हालाच ‘सीलिंग आॅफिसर’ नेमू.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnewsबातम्या