हिंमत असेल, तर राष्ट्रपती राजवट आणा - ममता बॅनर्जी
By Admin | Updated: November 23, 2014 02:32 IST2014-11-23T02:32:31+5:302014-11-23T02:32:31+5:30
पक्षाचे खासदार श्रींजॉय बोस यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शनिवारी तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला़

हिंमत असेल, तर राष्ट्रपती राजवट आणा - ममता बॅनर्जी
कोलकाता : शारदा घोटाळ्याप्रकरणी आपल्या पक्षाचे खासदार श्रींजॉय बोस यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शनिवारी तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला़ मी व माङया पक्षाविरुद्ध सूड उगवला जात आहे, असा आरोप त्यांनी केला़ एवढेच नाही, तर हिंमत असेल तर केंद्राने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून दाखवावी, मला अटक करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिल़े
पक्षाच्या एका बैठकीत ममता बोलत होत्या़ पक्षाचे खासदार, आमदार आणि मंत्री या बैठकीला हजर होत़े हिंमत असेल तर त्यांनी मला तुरुंगात पाठवाव़े किती मोठा तुरुंग आहे, ते मी बघत़े आमच्यावर वार झाला तर आम्हीही जशास तसे प्रत्युत्तर देऊ़ त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी़ आम्ही मतपत्रिकांद्वारे त्याचे सडतोड उत्तर देऊ़ आम्ही सत्तेचे गुलाम नाही़ आम्ही केवळ लोकांसाठी काम करतो, असे ममता यावेळी म्हणाल्या़
काँग्रेसने आयोजित केलेल्या नेहरू परिषदेला हजेरी लावली म्हणून भाजपा मला व माङया पक्षाला लक्ष्य करीत आह़े तृणमूल खासदार श्रींजॉय बोस यांना झालेली अटक त्याचाच परिपाक असल्याचा दावा ममतांनी यावेळी केला़ (वृत्तसंस्था)