केजरीवालांपासून दूर रहा नाहीतर तुमचा दाभोलकर करू - अण्णा हजारेंना धमकी
By Admin | Updated: August 11, 2015 15:17 IST2015-08-11T14:29:49+5:302015-08-11T15:17:08+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यापासून दूर रहा नाहीतर तुमचा दाभोलकर करू अशी धमकी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे

केजरीवालांपासून दूर रहा नाहीतर तुमचा दाभोलकर करू - अण्णा हजारेंना धमकी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - ' दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यापासून दूर रहा नाहीतर तुमचा दाभोलकर करू' अशी धमकी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. इंग्रजीत लिहीण्यात आलेल्या या पत्रात ७ ऑगस्टची तारीख असून केजरीवाल यांच्यासोबत राहू नका, नाहीतर झटका दाखवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी पुण्यात हत्या करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मार्गानेच अण्णांना जावे लागेल, असे या पत्रात म्हटले आहे. तसेच 'अण्णांनी राळेगण सिद्धीमध्येच रहावे, अरविंद केजरीवाल यांच्याशी फारसे संबंध वाठवू नये' असेही पत्रात लिहीण्यात आले आहे.
अण्णा हजारेंनी अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये भेट घेतली होती.