शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पटेलांचा पुतळा उभारता येतो, मग राम मंदिरासाठी कायदा का करता येत नाही?- संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:00 IST

राम मंदिराच्या मुद्यावरुन संघ आक्रमक

मुंबई: वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, मग राम मंदिरासाठी कायदा का केला जाऊ शकत नाही?, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विचारण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सभेत संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी हा प्रश्न विचारला. गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्यासह अनेक हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर मग भव्य राम मंदिरासाठी कायदा संमत का केला जात नाही?, असा प्रश्न होसबळे यांनी सभेला संबोधित करताना विचारला. याआधी संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी कायदा करण्याची मागणी भागवत यांनी केली होती. आता होसबळे यांनी संघाच्या याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. दत्तात्रय होसबळे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करताना पी. व्ही. नरसिंह राव यांच्या विधानाचा संदर्भ दिला. 'वादग्रस्त जमिनीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यास ती जमीन मंदिराच्या उभारणीसाठी दिली जाईल, अशी माहिती पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. त्यानंतर उत्खननात मंदिराचे अवशेषदेखील सापडले. मात्र आता या प्रकरणी निकाल देण्यास न्यायालय टाळाटाळ करत आहे. या सुनावणीला प्राधान्य द्यावं, असं न्यायालयाला वाटत नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्वतंत्र घटनापीठाची स्थापना केली आहे. मात्र प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणावर अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही,' असं म्हणत होसबळे यांनी न्यायालयाकडून होणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याBJPभाजपा