शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"इतर राष्ट्रप्रमुखांनी कोरोना लस घेतली, मग केंद्र सरकारमधील जबाबदार नेते मागे का?"

By कुणाल गवाणकर | Updated: January 16, 2021 15:27 IST

काँग्रेस खासदार मनिष तिवारींचा कोरोना लसीकरणावर सवाल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला. मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची आवश्यक असताना त्या न करता कोरोना लसींच्या वापरास परवानगी दिल्याचं काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी म्हटलं. कोरोना लस इतकी परिणामकारक आहे, मग सरकारमधील कोणत्याही महत्त्वाच्या नेत्यानं ती का घेतली नाही, असा सवाल लोकसभेत आनंदपूर साहिबचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिवारींनी उपस्थित केला.जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या देशांच्या प्रमुखांनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष ज्यो बायडन, उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी लस घेतली आहे. ब्रिटनमध्ये राणी एलिझाबेझ आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लस टोचून घेतली आहे. इतरही देशांच्या प्रमुखांनी कोरोना लस घेतली आहे. मग भारतात सरकारमधील कोणत्याही जबाबदार व्यक्तीनं लस का घेतली नाही? कोरोना लस सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे ना? मग सरकारमधील व्यक्ती लस टोचून घेण्यात मागे का?, असे प्रश्न तिवारींनी विचारले.परवानगी देण्यात आलेल्या कोरोना लसींबद्दलही तिवारींनी सवाल उपस्थित केले आहेत. 'कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देणारी कोणतीही ठोस चौकट आपल्याकडे नाही. पण तरीही आपत्कालीन स्थितीत दोन लसींच्या मर्यादित वापरास परवानगी दिली गेली. कोवॅक्सिनची गोष्ट तर वेगळीच आहे. चाचणी प्रक्रिया पूर्ण न करताच कोवॅक्सिनच्या वापरास मंजुरी दिली गेली आहे,' असं तिवारींनी म्हटलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJoe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिस