शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

...तर कितीतरी मजूर भुकेने मेले असते! पंतप्रधानांच्या विधानावर अभिनेता सोनू सूद यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 06:49 IST

"कोरोना एका राज्याचा नव्हता, पूर्ण देशालाच कोरोनाने घेरलेले होते. तो महाराष्ट्रातून पसरला असे कसे म्हणता असा सवालही सोनू सूद यांनी केला."

यदु जोशी -मोगा (पंजाब) : कोरोनाच्या पहिल्या भीषण टप्प्यात मुंबईतील हजारो उत्तर प्रदेश, बिहारसह परप्रांतीय मजुरांना वेळीच त्यांच्या राज्यांमध्ये पाठविले नसते तर शेकडो जणांचा भुकेने  मृत्यू झाला असता, असे रोखठोक मत अभिनेते सोनू सोदू यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. कोरोना एका राज्याचा नव्हता, पूर्ण देशालाच कोरोनाने घेरलेले होते. तो महाराष्ट्रातून पसरला असे कसे म्हणता असा सवालही सोनू सूद यांनी केला.

सोनू यांच्या भगिनी मालविका सूद काँग्रेसतर्फे लढताहेत. मालविका यांना ‘मोगाच्या सोनू सूद’ म्हटले जाते. इथे त्यांचे अतिशय मोठे सामाजिक कार्य आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत सोनू सूद म्हणाले की, मला कुणाच्या विधानावर टीका करायची नाही. मजूर तेव्हा असहाय होते. रात्रीबेरात्री मला फोन करायचे. रडायचे. त्यांचा आक्रोश बघवत नव्हता. चारपाच महिन्याची बाळे घेऊन महिला यायच्या, आम्हाला गावी जाऊ द्या अशी विनवणी करायच्या. भयंकर स्थिती होती. तीन हजार लोकांना स्थलांतरित करण्याची परवानगी मिळाली तर सहा-सहा हजार लोक येऊन उभे राहायचे. त्यांना तेव्हा पाठविले नसते तर ते अन् त्यांची मुलं रस्त्यावर मरून पडली असती. 

मजुरांच्या वेदना सांगताना ते म्हणाले की, त्यांच्याकडे खायला पैसे नव्हते, घरभाड्यासाठी पैसे नव्हते. मग प्रवासासाठी कुठून पैसे येतील? त्यांना त्यांच्या माणसांजवळ परत पाठविणे हे भावनिकदृष्ट्याही त्यांना मोठा धीर देणारे ठरले. कोरोना पसरवायला ते गेले असे नाही म्हणता येणार. ते संकट इतके भीषण होते की त्या धक्क्यातून लोक आजही सावरलेले नाहीत.

मंत्रिपदाच्या ऑफर नाकारल्या -राजकारणात जाणारच नाही असे अजिबात नाही पण ती वेळ अजून आलेली नाही. अजून काही वर्षे मी सामाजिक कार्यच करणार. मुंबईनजीक हॉस्पिटल उभारतो आहे. आणखी बरेच काही करायचे आहे. यावेळी अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा कॅबिनेट मंत्रिपदाच्या ऑफर वेगवेगळ्या पक्षांकडून आल्या पण मी त्या नम्रपणे नाकारल्या.

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस