गरज पडल्यास भारतावर डागण्यासाठीच आहेत अण्वस्त्रं - पाकिस्तान
By Admin | Updated: October 20, 2015 14:39 IST2015-10-20T14:39:42+5:302015-10-20T14:39:42+5:30
वेळ पडल्यास भारताच्या विरोधात वापरता यावीत याच उद्देशाने कमी संहारक अशा अण्वस्त्रांची निर्मिती पाकिस्तानने केली असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाझ चौधरींनी दिली आहे.

गरज पडल्यास भारतावर डागण्यासाठीच आहेत अण्वस्त्रं - पाकिस्तान
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. २० - वेळ पडल्यास भारताच्या विरोधात वापरता यावीत याच उद्देशाने कमी संहारक अशा अण्वस्त्रांची निर्मिती पाकिस्तानने केली असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाझ चौधरींनी दिली आहे. भारतही अण्वस्त्रसज्ज असल्यामुळे आणि भारतीय लष्कर त्यांचा वापर करण्याची शक्यता विचारात घेऊनच पाकिस्ताननेही त्या दिशेने पावले उचलल्याचा दावा चौधरींनी केल्याचे वृत्त डॉनने दिले आहे.
आत्तापर्यंत पाकिस्तानची अण्वस्त्रांची सज्जता हा चर्चेचा विषय होता, परंतु प्रथमच सरकारी स्तरावर त्याला पुष्टी मिळाली आहे. पाकिस्तानने अमेरिकेसोबत अणूकरार करावा अशी मागणी अमेरिका करत असली तरी अशा प्रकारचा करार नवाझ शरीफ यांच्या अमेरिका भेटीत होणार नसल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानची अण्वस्त्रसज्जता युद्ध सुरू करण्यासाठी नसून शत्रूराष्ट्राला किंवा भारताला वचक म्हणून असल्याचा दावाही चौधरी यांनी केला आहे.