शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

“सरकार आलं तर राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापू,” काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:34 IST

राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान केलं वक्तव्य.

Surat Court Judge H H Varma Threatening Case: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात २०१९ च्या मानहानीच्या खटल्याचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापण्याची धमकी तामिळनाडूतील काँग्रेसच्या नेत्यानं दिली आहे. “जर काँग्रेसचं सरकार आलं तर ज्या न्यायाधीशांनी राहुल गांधींना शिक्षा सुनावली त्यांची जीभ कापू,” असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेत्यानं केलंय. राहुल गांधी यांना मोदी आडनावाच्या टीकेवरून २३ मार्च रोजी सुरत न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याचवेळी, मणिकंदन यांच्या आक्षेपार्ह विधानासाठी आयपीसीच्या कलम १५३बी सह तीन कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मणिकंदन यांच्याविरोधात आयपीसी १५३ बी सह तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

तामिळनाडूतील दिंडीगुल येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या विरोधात काँग्रेसच्या एससी/एसटी शाखेकडून आंदोलन सुरू होतं. “२३ मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ऐका, न्यायमूर्ती एच वर्मा, जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू.” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं.

अमित मालवीयंनी साधला निशाणाभारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मणिकंदन यांच्या वक्तव्यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. न्यायव्यवस्थेला धमकावणाऱ्या पक्षाच्या लोकांसाठी न्यायालयानं राहुल गांधींना जबाबदार धरलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा