शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार?; वडेट्टीवारांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 05:55 IST

राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतलेली आहे. 

- आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी दिल्लीत ठाण मांडले असून, या नेत्यांनी एकानंतर एक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवावे, अशी विनंती केली आहे. राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतलेली आहे. 

यातील अनेक नेत्यांनी सांगितले आहे की, पटोले यांचा राज्यातील कोणत्याही नेत्याशी समन्वय नाही. ते कोणालाच बरोबर घेत नाहीत. अलीकडेच प्रदेश काँग्रेस कमिटीची वीज कापण्यात आली. नाना पटोले महाराष्ट्रातील ‘नवज्योत सिंह सिद्धू’ झाले आहेत. काँग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावे लागेल.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व काँग्रेस कार्यकारिणीचे गठण झाल्यानंतर लगेच महाराष्ट्राबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी या नेत्यांना आश्वासन दिले आहे; परंतु ‘लोकमत’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मागील अनेक महिन्यांपासून कर्नाटक निवडणुकीत व्यग्र होते व त्यांचे जाणेही निश्चित आहे. महाराष्ट्र काँग्रेसला आधी नवीन सरचिटणीस प्रभारी मिळतील. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत निर्णय घेण्यात येईल. 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार