शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

फटाक्यांवरील बंदी अमलात आणल्यास दिवाळीत दिल्लीकरांना मिळणार ८ वर्षांतील सर्वोत्तम हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:22 IST

पाऊस आणि वाऱ्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली 

नवी दिल्ली : फटाक्यांवरील कडक निर्बंध अमलात आणले गेले, तर दिवाळीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता गेल्या आठ वर्षांतील सर्वोत्तम राहू शकते. दिल्लीकरांची रविवारची सकाळ निरभ्र आकाश व सूर्यप्रकाशासह झाली. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय)  सकाळी सात वाजता २०२ होता. जो गेल्या तीन आठवड्यांतील सर्वोत्तम आहे. शून्य ते ५० दरम्यानचा एक्यूआय ‘चांगला’ असतो. ५१ ते १०० दरम्यानचा ‘समाधानकारक’, १०१ ते २०० ‘मध्यम’आहे, २०१ ते ३०० ‘खराब’, ३०१ ते ४०० ‘अत्यंत खराब’, ४०१ ते ४५० दरम्यानचा एक्यूआय ‘गंभीर’ व ४५० वरील एक्यूआयची ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीत गणना होते. 

काल शनिवारी (दि. ११) दिवाळीच्या पूर्वसंध्येला २४ तासांचा सरासरी एक्यूआय २२० होता. जो आठ वर्षांतील सर्वोत्तम होता. यावेळी दिल्लीत दिवाळीपूर्वी हवेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा झाली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शुक्रवारी अधूनमधून पडणारा पाऊस आणि प्रदूषकांना वाहून नेण्यासाठी अनुकूल वाऱ्याचा वेग. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दिवाळीत दिल्लीतील एक्यूआय ३१२, २०२१ मध्ये ३८२, २०२० मध्ये ४१४, २०१९ मध्ये ३३७, २०१८ मध्ये २८१, २०१७ मध्ये ३१९ आणि २०१६ मध्ये ४३१ होता. (वृत्तसंस्था)

पावसाने मिळाला दिलासा

२८ ऑक्टोबरपासून पुढील दोन आठवडे शहरातील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ ते ‘गंभीर’ अशी होती. या काळात राजधानीला धूळमिश्रीत धुक्याने गुदमरून टाकले होते. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हलक्या पावसासह अनुकूल हवामानामुळे दिवाळीपूर्वी हवेच्या गुणवत्तेत किरकोळ सुधारणा होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आधीच वर्तवला होता. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब आणि हरयाणासह वायव्य भारतातील बहुतांश भागात पाऊस पडला. त्यामुळे शेतकचरा जाळण्याने पसरणाऱ्या धुराचे प्रमाण कमी होऊन दिल्लीकरांना थोडा दिलासा मिळाला.

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्ली