चर्चा तर होणारच अरे आता सुग
By Admin | Updated: January 23, 2017 20:13 IST2017-01-23T20:13:02+5:302017-01-23T20:13:02+5:30
ीचे दिवस

चर्चा तर होणारच अरे आता सुग
ी े दिवसजिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गावा-गावात चर्चा रंगत आहे. अशीच एक चर्चा चिपरी येथील ग्रामपंचयातीच्या समोर दोन गटात सुरू होती. यावेळी एकजण म्हणाला अरे अजून निवडणुकीला किती दिवस बाकी आहेत. यावर दुसरा एकजण म्हणाला अरे दिवसाच बाजूला ठेव आता सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. असेच म्हणाताच सर्वानी ऐकमेकांच्या हातावर टाळी दिली.उमेदवारी काकालाचखासदार आमदाराच्या गावात जिल्हा परीषद मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेक इच्छुक उमेदवांराची गोची झाली. मात्र, सध्या उमेदवारी कोणाला यावरून तालूक्याच्या गावात चर्चेचे गुर्हाळ सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडुन उमेदवारी काकाला कि पुतन्याला यावरून चौकात चर्चा सुरू होती. साहेबांनी पुतन्याला कामाला लाग असा शब्द दिला आहे. असे एक कार्यकर्ता सांगत होता. त्यावर उपस्थित असणारा काकाचा कार्यकर्ता म्हणाला उमेदवारी आमचीच फायनल हाय. असे म्हणाताच इच्छुकांचे पारंबे उडाले. -संतोष बामणे, संदीप बावचे जयसिंगपूर