उगाच कोणी अंगावर आले तर नरमणार नाही
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30

उगाच कोणी अंगावर आले तर नरमणार नाही
> उद्धव ठाकरे यांचा इशारापुणे : आम्ही हिंदु आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. त्याची आम्हाला लाज नाही. मात्र याचा अर्थ आम्ही दुसर्या धर्माचा व्देष करतो असा नाही. उगाच कोणी अंगावर येत असेल तर आम्ही नरमाईची भुमिका घेणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. शहर शिवसेनेने कर्वेनगरमधील वसुंधरा पंडित फार्ममध्ये आज कृतज्ञता मेळाव्याचे व त्यानिमित्त निमंत्रितांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ठाकरे बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री शशिकांत सुतार, आदेश बांदेकर, जिल्हा संपर्क नेते अमोल कोल्हे, शहर प्रमुख विनायक निम्हण आदी उपस्थित होते. आम्ही निवडणुकीपुर्वी विरोधी पक्षात होतो, आता सत्तेत सहभागी आहोत. पुण्याने आमदार निवडून दिले नसले तरी मते दिली आहेत. मत आणि मत आमच्यासाठी मोलाचे आहे. आता सत्तेत आल्यानंतर काही प्रश्न सोडवावे लागतील, असे सांगून ठाकरे म्हणाले निम्हण यांच्या रूपाने शिवसेनेत घरवापसी सुरू झाली आहे. शिवसेना सोडून जे गेले आहेत, त्यांना शिवसेनेशिवाय करमत नाही. नुकत्याच पदाधिकार्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. शिवसेनेचे वाघ, मर्द एकत्र आले तर पुणे पालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही किती जणांनी शिवबंधन बांधले आहे ते हात वर करून दाखवा, असे आवाहन केल्यानंतर ठाकरे म्हणाले कार्यकर्त्यांनी जल्लोष करावाच, पण कामही करावे. गाव तेथे शिवसेना हे त्यांनी दाखवून द्यावे. शिवबंधन हा काही गंडादोरा नाही. ती वचनबद्धता आहे. शिस्त ही शिवसैनिकांच्या रक्तामध्येच आहे. कृतज्ञता मेळावे घेण्याच्या निम्हण यांच्या कल्पनेचे स्वागत करून ठाकरे म्हणाले अनेकांना मला भेटायचे असते पण ते शक्य होत नाही. मला पुण्यात येणे शक्य होत नाही. त्यामुळे असे मेळावे मी अनेक ठिकाणी घेईन. मिसळ पे चर्चा असा विषय झाला पण मिसळ, वडे असे काही येथे दिसत नाही.