शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जर सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान असते तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 15:48 IST

झारखंडमध्ये मॉब लिंचिगचं प्रकरण झालं. युवकाची हत्या करण्यात आली. हे दुख:दायक आहे. दोषींना कठोर शासन होईल. मात्र अशा घटनांसाठी एका राज्याला जबाबदार धरणे कितपत योग्य आहे?

नवी दिल्ली - काँग्रेस फक्त ईव्हीएमचा विरोध करत नाही तर सर्वच गोष्टीचा विरोध करतं. विरोधी पक्षाचा अर्थ शब्दानुरुप काँग्रेसने घेतला आहे. डिजिटल व्यवहारांना विरोध, आधारला विरोध जर आम्ही नवीन भारत बनवत आहे त्याला विरोध, जीएसटीला विरोध अशा सर्वच गोष्टींना विरोध करणे म्हणजे नकारात्मकता आहे. ज्या लोकांनी फक्त विरोधाचं काम केलं.

सरकारच्या प्रत्येक कामाला विरोध करणाऱ्यांनी देशातील जनतेने शिक्षा दिली आहे. लोकसभा नव्हे तर राज्यसभेत काय करताय हे बघूनच जनतेने मतदान केलं असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

जुना भारत कसा हवा आहे?न्यू इंडियाचा विरोध केला जात आहे. काही चुकीचं असू शकेल पण सर्वच चुकीचं आहे सांगणे किती योग्य आहे? आम्हाला जुना भारत हवा आहे म्हणजे कसा भारत हवा आहे? कॅबिनेटचा निर्णय फाडून फेकून देणं. जिथे सगळीकडे फक्त घोटाळे आणि घोटाळेच होते. गॅस कनेक्शनसाठी रांगेत उभं राहायला लागत होतं. पासपोर्टसाठी महिनाभर वाट बघावी लागत होती. देशाची जनता आता जुन्या काळात जाऊ इच्छित नाही. आम्ही सामान्य माणसांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही नीती आणि रणनीती बदलत आहोत. पाच वर्षात अनेकांनी घरे मिळाली, वीज मिळाली. आम्ही मोठे झालो नाही गरिबांच्या छोट्या छोट्या समस्या सोडविल्या. 

हिंसाचाराच्या घटनांवर राजकारण नको झारखंडमध्ये मॉब लिंचिगचं प्रकरण झालं. युवकाची हत्या करण्यात आली. हे दुख:दायक आहे. दोषींना कठोर शासन होईल. मात्र अशा घटनांसाठी एका राज्याला जबाबदार धरणे कितपत योग्य आहे? सर्वांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं राजकारण केल्याने परिस्थिती सुधारणार नाही. गुन्हा घडल्यानंतर संविधान, कायदा आणि व्यवस्था आहे. दोषींना शिक्षा देण्यासाठी जे करता येणं शक्य आहे ते सर्व करणारच. हिंसाचाराच्या घटनांवर राजकारण करु नये. 

सरदार पटेलांनी आम्हाला सन्मान दिलाजर सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान असते तर काश्मीर समस्या नसती. त्यांनी 500 संस्थानं खालसा केली. सरदार पटेल काँग्रेसचे होते. त्यांनी काँग्रेससाठी आयुष्य खर्च केले. देशाच्या निवडणुकीत सरदार पटेल दिसत नसले तरी गुजरातच्या निवडणुकीत ते नेहमी दिसतात. आम्ही तुमच्या पक्षातील नेत्याची सर्वात मोठी प्रतिमा गुजरातमध्ये बनविली आहे. काँग्रेस नेत्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिलं पाहिजे. 

बिहारमधील चमकी ताप ही लाजिरवाणी बाब आयुष्यमान भारत योजनेवर सभागृहात प्रश्न उपस्थित केले जातात. पाच वर्षात अनेक खासदारांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत देण्याची विनंती केली. आयुष्यमान भारतची ताकद काय आहे हे त्या खासदारांना माहित आहे. ज्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पत्र दिलं आज एकही पत्र पेडिंग नाही. कारण त्याला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळतो. एका आजाराने 20 वर्षाची मेहनत वाया जाते. श्रेय मोदी घेऊन जाईल याची चिंता करु नका. 2024 मध्ये नवीन योजना घेऊन येऊ. बिहारमध्ये आलेला चमकी ताप आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. हे गांभीर्याने घ्यायला हवं. बिहारला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आरोग्यमंत्री यावर लक्ष ठेऊन आहेत.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस