शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:01 IST

Rahul Gandhi on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या भूमिकेबद्दलच शंका उपस्थित केल्या. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून आव्हान दिले.  

Rahul Gandhi on PM Modi: "हवाई हल्ला केल्यानंतर सरकारने आधीच पाकिस्तान सरकारसमोर शरणागती पत्करली. कारण या हवाई हल्ल्यांचा उद्देश फक्त पंतप्रधानांची प्रतिमा सुधारणे हाच होता. पहलगाममध्ये लोकांच्या हत्यांचे रक्त त्यांच्या हाताला लागले होते, त्यामुळे हवाई दलाचा वापर करून त्यांची प्रतिमा सुधारण्यात आली", असा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान केले. "पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये इंदिरा गांधींच्या तुलनेत ५० टक्केही हिंमत असेल, तर त्यांनी संसदेत सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत आणि त्यांनी हा संघर्ष थांबवला नाही", असे आव्हान राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना दिले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ वेळा सांगितले की, मी शस्त्रसंधी केली. अच्छा. मग जर ते खोटं बोलत आहेत, तर पंतप्रधानांनी इथे आपल्या भाषणात सांगावं की, ते खोटं बोलत आहेत."

"इथून सांगा की डोनाल्ड ट्रम्प तुम्ही खोटारडे आहात"

"जर तुमच्यामध्ये हिंमत असेल, तर इथे पंतप्रधानांनी बोलावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत. जर त्यांच्यात ते धाडस असेल... जर त्यांच्यामध्ये इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर त्यांनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही शस्त्रसंधी नाही केली आणि आम्ही एकही लढाई विमान गमावलेले नाही", अशा शब्दात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, "इंदिरा गांधींच्या तुलनेत तुमच्यात ५० टक्के जरी हिंमत असेल, तर पंतप्रधान इथे बोलतील. डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत. ते खोटं बोलत आहेत", असे राहुल गांधी म्हणाले.

"पाकिस्तानचा निषेध एकाही देशाने केला नाही"

राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "परराष्ट्र मंत्री म्हणाले की, सर्व देशांनी दहशतवादी घटनेचा निषेध केला आहे. हे शंभर टक्के खरं आहे. पण, त्यांनी हे नाही सांगितलं की पहलगामनंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही. एकही देश नाही, ज्याने पाकिस्तानचा निषेध केला असेल. याचा अर्थ काय आहे की, जग भारताला पाकिस्तानच्याच पातळीवर बघत आहे", अशी टीका राहुल गांधींनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक