शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

Video: गरज भासल्यास हातात शस्त्रं घेऊन संरक्षण करु; EVM संशयाचं रण पेटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 17:37 IST

एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे.

पटणा - लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधील आकडेवारीने राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे. बिहारच्या आघाडीमधील आरएलएसपीचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी जर ईव्हीएममध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही हातात शस्त्र घेऊ, मतांच्या रक्षणासाठी बलिदान देऊ असं विधान केल्याने खळबळ माजली आहे. 

यावेळी बोलताना उपेंद्र कुशवाहा म्हणाले की, ईव्हीएमबाबत छेडछाड करण्याचे प्रकार होत आहेत. जनतेमध्ये आक्रोश आहे. लोकांनी केलेलं मतदान लुटण्याचे काम केले जात आहे. जर जनतेची मते लुटली जात असतील गरज पडल्यास हाती शस्त्रे घेऊ असा इशारा त्यांनी दिला. तसेच वेळ पडली तर बिहारच्या जनतेनेही हातात हत्यार घेऊन संरक्षणासाठी घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. बिहार लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. नितीश कुमार यांच्यासाथीने भाजपा बिहारमध्ये निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एनडीएला बिहारमध्ये किमान 30 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी अशाप्रकारे वातावरण निर्मिती केली जात आहे. स्ट्राँगरुममधून ईव्हीएम खाजगी वाहनांमध्ये घालून कुठे नेतायेत? काय गडबड सुरु आहे असं राबडी देवी यांनी संशय व्यक्त केला. 

बिहारच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीत अनेक फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीत वेगळे लढल्याने त्यांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एनडीएने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पुढे केल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीएशी फारकत घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांची जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांची आरजेडी यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. पण आरजेडी-जेडीयू आघाडी फार काळ टिकली नाही त्यानंतर जेडीयूने पुन्हा भाजपाशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. यंदाच्या निवडणुकीत जेडीयू 17, भाजपा 17 जागांवर लढत आहे. त्यामुळे निकालांमध्ये भाजपाला किती यश मिळते हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीVotingमतदानBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019