गरज भासल्यास कंत्राट रद्द करू
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:27+5:302015-02-06T22:35:27+5:30

गरज भासल्यास कंत्राट रद्द करू
>सुरेश भट सभागृह रखडले: महापौरांनी दिला इशारानागपूर : सुरेश भट सभागृहाचे बांधकाम काही दिवसापासून ठप्प आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, कंत्राटदार व मनपा यांच्यात समेट होत नसेल तर संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करू ,असा इशारा महापौर प्रवीण दटके यांनी शुक्र वारी पत्रकार परिषदेत दिला.या सभागृहाचे काम यापूर्वीही थांबले होते. परंतु त्यावर तोडगा काढण्यात आला होता. आता पुन्हा हे काम थांबले आहे. प्रशासन याबाबत गंभीर असून यावर लवकरच मार्ग काढला जाईल. सिमेंट रस्त्यांसाठी संबंधित कंत्राटदारासोबत पुन्हा करार करण्यात आला आहे. आर्बिट्रेटरच्या अहवालानुसार संबंधित कंत्राटदाराला मनपा २. ५० कोटी देणार आहे. (प्रतिनिधी)चौकट....३०० कोटींचा प्रस्तावमनपा, नासुप्र व राज्य सरकार यांच्या निधीतून शहरात ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार हा प्रस्ताव संबंधित विभागाला पाठविला जाणार आहे. सरकारकडून मंजुरी मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे दटके म्हणाले.