शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास राम मंदिराच्या गेटसमोर आत्महत्या करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 16:41 IST

वसीम रिजवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गायले असून 2019 मध्ये मोदीच देशाचे पंतप्रधान होतील,

लखनौ - लोकसभा निवडणुकांचे मतदान अंतिम टप्प्यात येत असताना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणाची सत्ता येणार आणि कोण पंतप्रधान होणार यावर पैजा लागत आहेत. तर, अनेकजण आप-आपले भाकित सांगताना अक्षरश: जीवाची बाजी लावताना दिसून येत आहे. शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनीही असेच विधान केले आहे. 

वसीम रिजवी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींचे गोडवे गायले असून 2019 मध्ये मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकित केले आहे. विशेष म्हणजे मोदी पंतप्रधान न झाल्यास अयोध्येतील राम मंदिराच्या गेटजवळच मी आत्महत्या करेन, असे वसीम रिजवी यांनी म्हटले आहे. कुठल्याही धर्मापेक्षा राष्ट्रच सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत रिजवी यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. 

मी जेव्हा देश आणि देशहितासंदर्भात बोलतो, त्यावेळी कट्टरपंथीयांकडून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. देशातून मोदी सरकार गेल्यास, आम्ही तुझे तुकडे-तुकडे करू, अशी धमकी मला मिळत असल्याचेही रिजवी यांनी म्हटले आहे. देशप्रेमी लोकांमध्ये मोदींप्रती प्रेम, तर गद्दारांमध्ये भीती आहे. नरेंद्र मोदी हेच कुशल पंतप्रधान आहेत. त्यामुळे जर 2019 मध्ये इतर कुठल्याही पक्षाचा नेता पंतप्रधान झाला, तर मी अयोध्येतील राम मंदिराच्या गेटजवळ जाऊन आत्महत्या करेल. कारण, देशद्रोह्यांच्या हातून मरण्यापेक्षा सन्मानपूर्वक जीवन संपवेल, असे रिजवी यांनी म्हटले आहे. 

कोण आहेत रिजवीवसीम रिवजी हे शिया वक्फ बोर्डचे प्रमुख आहेत. राम मंदिरसंदर्भातील वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. बाबरी मशिद ही शिया वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर, अयोध्येत राम मंदिर व्हावे आणि मशिदीसाठी इतरत्र जागा निर्माण केली पाहिजे, असेही मत ते परखडपणे मांडतात. त्यामुळे मुस्लीम समाजातील अनेक संघटनांचा त्यांना विरोध आहे. 

दरम्यान भोपाळमध्येही निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे.  दरम्यान, पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन अशी, प्रतिज्ञा त्यांनी केली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या