शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मोदींनी डॉक्टर व्हावे, तरच समजतील व्यथा,एम्सच्या निवासी डॉक्टरांचे पत्राद्वारे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:06 AM

आम्ही तोंड देत असलेले ताण-तणाव व व्यथा समजून घेण्यासाठी एक दिवस आमचे आयुष्य जगून बघा, असे आवाहन येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) निवासी डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

नवी दिल्ली : आम्ही तोंड देत असलेले ताण-तणाव व व्यथा समजून घेण्यासाठी एक दिवस आमचे आयुष्य जगून बघा, असे आवाहन येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) निवासी डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.राजस्थानातील डॉक्टरांनी वाढीव वेतन आणि बढत्यांसाठी केलेल्या आंदोलनाला एम्सच्या डॉक्टरांनी पाठिंबा दिला. एम्स रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (आरडीए) शनिवारी मोदी यांना पाठवलेल्या पत्रात सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांवर अत्यंत सामान्य सोयीसुविधा आणि आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणारे चुकीचे वर्तन/मारहाण या परिस्थितीत असणारा प्रचंड दबाब मोदी यांनी समजून घ्यावा, असे म्हटले.तुमच्यासारखा सक्रिय पंतप्रधान आम्हाला लाभला याबद्दल आम्ही नशिबवान आहोत, असे म्हणून आरडीएचे अध्यक्ष हरजीत सिंग भट्टी यांनी या पत्रात म्हटले आहे की आता आम्ही तुम्हाला अशी विनंती करीत आहोत की आम्ही तोंड देत असलेला दबाब समजून घेण्यासाठी, उपचार मिळत नसलेल्या रुग्णांच्या व्यथा, पायाभूत सुविधा व संसाधनांअभावी खालावत चाललेली आरोग्य व्यवस्था पाहण्यासाठी तुम्ही एक दिवस सरकारी डॉक्टर या नात्याने अ‍ॅप्रन घालून काम करावे.सरकारी डॉक्टर या नात्याने तुम्ही केलेल्या एक दिवसाच्या कामामुळे आरोग्य व्यवस्थेला महत्वाचे वळण मिळेल व आरोग्य व्यवसायावरील विश्वासही पूर्ववत होईल, असे पत्रात म्हटले आहे.