मोदींनी 'मित्रो' म्हटलं तर 31 रुपयांत मिळणार बिअर

By Admin | Updated: December 31, 2016 15:54 IST2016-12-31T15:54:54+5:302016-12-31T15:54:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर सवयीप्रमाणे मित्रो म्हटलं तर या बारमध्ये फक्त 31 रुपयांमध्ये बिअर किंवा एक ड्रिंक शॉट मिळणार आहे

If Modi says 'Friends', then beer will be given at 31 rupees | मोदींनी 'मित्रो' म्हटलं तर 31 रुपयांत मिळणार बिअर

मोदींनी 'मित्रो' म्हटलं तर 31 रुपयांत मिळणार बिअर

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - नवीन वर्षाच्या आगमानसाठी सगळेजण सज्ज झाले आहेत. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी सगळेजण नवीन जागांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे हॉटेल, बारमालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ऑफर्स देत आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार असल्याने आता काय नवीन घोषणा होणार आहेत याचंही दडपण अनेकांवर आहे. याचाच फायदा घेत सोशल ऑफलाइन नावाच्या एका बारने ग्राहकांसाठी अशीच एक घोषणा केली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर सवयीप्रमाणे मित्रो म्हटलं तर या बारमध्ये फक्त 31 रुपयांमध्ये बिअर किंवा एक ड्रिंक शॉट मिळणार आहे. इतकंच नाही जितक्या वेळी मोदी मित्रो म्हणतील तितक्या वेळा ही ऑफर लागू असणार आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुसह अनेक ठिकाणी हा बार आहे. 
 
नोटाबंदीला 50 दिवस पुर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी देशाला संबोधित करणार आहेत. सोशल ऑफलाइन बारप्रमाणे अनेक ठिकाणी मोदींचं भाषण लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल ऑफलाइनने फेसबूक पेजवरुन यासंबंधी माहिती दिली असून ऑफरदेखील जाहीर केली आहे. 
 

Web Title: If Modi says 'Friends', then beer will be given at 31 rupees