शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला, तर देशात मोठी दरी निर्माण होईल': रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 12:25 IST

'देशाला हुकूमशाही नेतृत्वाची गरज नाही, लोकशाही आणि संस्था जितक्या मजबूत असतील तितका देश प्रगती करेल.'

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (raghuram rajan) यांनी देशातील अल्पसंख्याकांबाबत मोठे विधान केले आहे. शनिवारी छत्तीसगडमधील रायपूरमध्ये ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस (AIPC) तर्फे आयोजित 5व्या राष्ट्रीय कॉन्क्लेव्हला संबोधित करताना राजन म्हाले की, 'अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला गेला, तर देशात मोठी दरी निर्माण होईल', असे मत त्यांनी व्यक्त केले.

परकी हस्तक्षेप वाढेलराजन म्हणाले की, दोन समाजात दरी वाढली तर परकीय हस्तक्षेप वाढेल आणि यामुळे भारत कमकुवत होईल. यावेळी राजन यांनी आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या श्रीलंकेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले तर देशात रोजगार निर्माण होणार नाही आणि भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल. 

उदारमतवादी लोकशाही आवश्यक यावेळी राजन यांनी उदारमतवादी लोकशाहीचे फायदे सांगितले. आर्थिक प्रगतीसाठी लोकशाही उदारमतवादी असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. लोकशाही आणि संस्था जितक्या मजबूत असतील तितका देश प्रगती करेल. उदारमतवादाबद्दल ते म्हणाले की, याचा अर्थ कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. देशाला हुकूमशाही नेतृत्वाची गरज नाही, असे राजन म्हणाले. 

भारत आर्थिक सुधारणांच्या मार्गावर ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान आणि श्रीलंका या शेजारी देशांप्रमाणे भारतावर संकट येण्याची सध्या शक्यता नाही. परकीय चलन वाढीसाठी रिझर्व्ह बँकेने उचललेली पावले आणि महागाईबाबत योग्य दिशेने उचलण्यात येणारी पावले योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नुकत्याच परदेशात झालेल्या एका कार्यक्रमात रघुराम राजन यांनी सरकारला सुधारणांना गती देण्याचा सल्ला दिला होता. भारताने सुधारणांना गती दिली नाही तर आर्थिक विकासाचा वेग मंदावू शकतो. गती तेव्हाच वाढू शकते जेव्हा चांगल्या सुधारणा केल्या आहेत, असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक