मिमिक्रीची हौस असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावे - राखी सावंत
By Admin | Updated: October 1, 2014 19:35 IST2014-10-01T19:35:20+5:302014-10-01T19:35:20+5:30
राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावे असा टोला राखी सावंतने लगावला आहे.

मिमिक्रीची हौस असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावे - राखी सावंत
ऑनलाइन लोकतम
मुंबई, दि. १ - मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतने प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावे असा टोला राखी सावंतने लगावला आहे.
गाजावाजा करत आरपीआयमध्ये दाखल झालेल्या राखी सावंतने बुधवारी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुंबईतील सभेत राज ठाकरेंनी रामदास आठवलेंची खिल्ली उडवली होती. यावर राखी म्हणते, राज ठाकरेंनी वडिलधा-या रामदास आठवलेंचा अपमान केला असून आठवलेंचा अपमान म्हणजे दलित समाजाचा अपमान. मराठीच्या नावाखाली राजकारण करणा-यांना भाजप - आरपीआय महायुती झोंबल्यानेच राज ठाकरेंनी आठवलेंवर टीका केली असे राखी सावंतने म्हटले आहे.
दुष्काळग्रस्तांची चेष्टा करणा-या अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला जनताच त्यांची जागा दाखवून देईल अशी विधानही राखीने केले आहे. आरपीआय- भाजप युती असल्याने भाजपाचाही प्रचार करणार असल्याचे राखीने स्पष्ट केले.