शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंगालच्या पवित्र मातीचा रसगुल्ला मी प्रसाद म्हणून स्वीकारेन, मोदींचे ममतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 19:37 IST

मातीची मिठाई तयार करून त्यात दगड घालून ती नरेंद्र  मोदींना खाऊ घालू, असे म्हणणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

श्रीरामपूर (पश्चिम बंगाल) - मातीची मिठाई तयार करून त्यात दगड घालून ती नरेंद्र  मोदींना खाऊ घालू, असे म्हणणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील माती आणि दगडांपासून तयार केलेला रसगुल्ला मिळासा, तर मी तो प्रसाद म्हणून स्वीकारेन असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज बंगालमधील श्रीरामपूर येथे झाली. त्यावेळी मोदींनी ममता बॅनर्जी यांनी रसगुल्ल्यावरून केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ''मला दगड आणि मातीपासून बनवलेले रसगुल्ले देण्याची इच्छा ममता दीदींनी व्यक्त केली. ही बंगालची माती रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, जगदीशचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शामाप्रसाद मुखर्जी अशा महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. त्यामुळे अशा महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील माती आणि दगडांपासून तयार केलेला रसगुल्ला मिळासा, तर मी तो मी प्रसाद म्हणून स्वीकारेन,'' असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यामध्ये दगडांचा वापर करु. ही मिठाई   मोदींना पाठवू, यामुळे मिठाई खाताना त्यांचे दात तुटतील, असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. बालुरघाट आणि गंगारामपूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी 'नरेंद्र मोदी याआधी पश्चिम बंगालमध्ये कधी आले नाहीत, आणि आता त्यांना बंगालमधून मते हवी आहेत. आम्ही त्यांना बंगालमधील रसगुल्ला देऊ. आम्ही मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यात दगडांचा वापर करू. ज्याप्रमाणे लाडू तयार करताना त्यात काजू, बेदाणे वापरतात त्याऐवजी दगडांचा वापर करु. यामुळे त्यांचे दात तुटतील’, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 2014 मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना मोठा रसगुल्ला म्हणजे भोपळा मिळेल अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक