तर काश्मीर संपूर्ण जगासाठी आकर्षण बिंदू ठरलं असतं - मोदी
By Admin | Updated: April 2, 2017 18:41 IST2017-04-02T18:41:03+5:302017-04-02T18:41:03+5:30
गेल्या 40 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये खूप हिंसाचार झाला, शेकडो निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे

तर काश्मीर संपूर्ण जगासाठी आकर्षण बिंदू ठरलं असतं - मोदी
ऑनलाइन लोकमत
उधमपूर, दि. 2 : गेल्या 40 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये खूप हिंसाचार झाला, शेकडो निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे. या 40 वर्षात जर पर्यटनावर भर दिला असता तर आज काश्मीर संपूर्ण जगासाठी आकर्षण बिंदू ठरलं असतं असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर येथिल सभेत व्यक्त केले. ते कश्मीर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महागार्ग 44 वरील उधमपूर ते रामबन या 10.89 कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे त्यांच्या हस्ते शानदार लोकार्पण झाले.
यावेळी बोलताना त्यांनी कश्मीरमध्ये हिंसाचार पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले. जम्मू-काश्मीरमध्ये काही भरकटलेले तरूण दगडफेक करत आहेत, पण दुसरीकडे काही तरूण तेच दगड कापून काश्मीरचे भाग्य बदलण्याचा प्रयत्न करत आहेत असे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या न भुतो न भविष्यति विजयाबद्दल जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले.