शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 18:16 IST

Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर केवळ ४८ तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल, असं विधान केलं आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक राज्यांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्याने सत्तांतराबाबत इंडिया आघाडीतील घटक पक्ष आणि नेत्यांना असलेल्या अपेक्षा वाढल्या आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर केवळ ४८ तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल, असं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दिसेल्या मुलाखतीमध्ये जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीला २७२ पेक्षा अधिक जागा मिळतील  असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर सध्या एनडीएमध्ये असलेले पक्षही इंडिया आघाडीत दाखल होतील, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. मात्र या पक्षांना आघाडीत घ्यायचं की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसचे हायकमांड घेतील.  

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या एनडीएमधील नेत्यांना इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे असतील का, असं विचारलं असता जयराम रमेश म्हणाले की, नितीश कुमार हे पलटी मारण्यात पटाईत आहेत. तर चंद्राबाबू नायडू हे २०१९ मध्ये काँग्रेससोबत होते. इंडिया आणि एनडीए आघाडीमध्ये दोन आयचं अंतर आहे. त्यातील एक आय म्हणजे इंसानियत आणि दुसरा आय म्हणजे इमानदारी. ज्या पक्षांच्या मनात इमानदारी आणि इन्सानियत आहे, मात्र जे पक्ष एनडीएमध्ये आहेत, ते इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच जनतेचा कौल मिळाल्यानंतर सत्तेवर येणारं सरकार हे हुकूमशाह नाही, तर जनतेचं सरकार असेल.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीprime ministerपंतप्रधान