शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

"देशाला ग्लोबल पॉवर बनायचं असेल तर...", आनंद महिंद्रांनी घेतला IPS मनोज शर्मांचा ऑटोग्राफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:45 IST

महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनी IPS अधिकारी मनोज शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांची भेट घेतली

12th Fail या चित्रपटाने अनेकांना प्रेरणा दिली... मध्यप्रदेशमधील चंबल गावातून एक तरुण ज्याला IPS म्हणजे काय हेही माहीत नव्हते, पण एका पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून तो प्रेरित झाला आणि त्याने थेट ग्वालियर गाठलं.. पण, नियतिच्या मनात काही वेगळंच होतं... आजीने पेंशनचे साठवलेले पैसेही चोरीला गेले... मग तो तिथून दिल्लीत आणि अनेक अडचणींवर मात देत IPS अधिकारी झाला... मनोज कुमार यांची हा प्रवास जेव्हा रिअल लाईफवरून रिल लाईफवर आला, तेव्हा सर्व चकित झाले. आज महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनी IPS अधिकारी मनोज शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांची भेट घेतली.... त्यांनी खास ट्विट केले.

आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ''जेव्हा मी त्यांना त्यांचा ऑटोग्राफ मागितला, तेव्हा ते लाजले. जे मी तुम्हाला अभिमानाने दाखवत आहे. मनोज कुमार शर्मा, IPS आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी, IRS, हे खरे वास्तविक जीवनातील नायक आहेत. असाधारण जोडपे ज्यांच्या जीवनावर #12thFail हा चित्रपट आधारित आहे. ''

ते पुढे म्हणतात,''आज दुपारच्या जेवणाच्या वेळी, मला कळले की चित्रपटात जे दाखवले गेले हे त्यांच्या वास्तविक जीवनाशी तंतोतंत जुळत आहे आणि ते आजही अखंड सचोटीने जीवन जगण्याच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सराव करत राहतात. भारताला जागतिक महासत्ता बनवायचे असेल, तर अधिकाधिक लोकांनी त्यांच्या जीवनशैलीचा अवलंब केल्यास ते अधिक वेगाने होईल. त्यामुळे तेच या देशाचे खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांना भेटल्यामुळे मी आज एक श्रीमंत माणूस आहे.'' IPS मनोज कुमार शर्मा हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार नव्हते. आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या कुटुंबात त्यांचं पालनपोषण झालं. मनोज कुमार शर्मा यांचा हा प्रवास सोपा नव्हता. मनोज कुमार हे बारावी नापास झाले होते. इयत्ता नववी आणि दहावीमध्ये कसेबसे उत्तीर्ण झाले. बारावीत फक्त हिंदी या एकाच विषयात पास झाले होते. मात्र तरी देखील त्यांनी जीद्द सोडली नाही. 

मनोज यांना अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी काही काळ टेम्पो देखील चालवला. त्यांना रात्री झोपण्यासाठी जागा देखील मिळत नसे. त्यामुळे भिकाऱ्यांसोबत झोपण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एका वाचनालयात काम सुरू केलं. या काळात त्यांचा पुस्तकांशी जवळून संबंध आला. त्यांचा य़ेथेच मॅक्सिम गार्की, अब्राहन लिंकन यांच्या विचारांशी परिचय झाला. पुढे हेच त्यांना अत्यंत फायद्याचं ठरलं. मनोज कुमार शर्मा UPSC परीक्षेत तीन वेळा नापास झाले होते. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात 121 वा क्रमांक मिळवून तो आयपीएस अधिकारी झाले.  

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी