शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मी पंतप्रधान असतो तर नोटाबंदी प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 20:01 IST

मी जर पंतप्रधान असतो तर नोटाबंदीचा प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता.

नवी दिल्ली- मी जर पंतप्रधान असतो तर नोटाबंदीचा प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. मी पंतप्रधान असतो व नोटाबंदीच्या प्रस्तावाची फाईल माझ्याकडे आली असती तर तो प्रस्ताव सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकला असता, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा निशाणा साधला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या दक्षिण आशियातील देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी आज मलेशियापासून या दौऱ्याला सुरूवात केली असून त्यांनी आज कुआलालंपूरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं. या कार्यक्रमात राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही नोटाबंदीचा निर्णय वेगळ्या प्रकारे कसा लागू केला असता? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. नोटाबंदीचा निर्णय कुणासाठीही फायद्याचा नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. 

 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरून शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय लागू करत 500 व 1000 रूपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार केल्या होत्या. मोदींच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षाने सडकून टीका केली होती. 

मलेशियात झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. महिला सशक्तिकरणावर राहुल गांधी यांनी म्हंटलं, महिला सशक्तिकरणासाठी फक्त समानता पुरेशी नाही. महिलांप्रती ज्या प्रकारचा पक्षपात समाजात आहे तो दूर करण्यासाठी पुरूषांच्या मदतीची जास्त गरज आहे. मी महिलांना पुरूषांच्या बरोबर मानत नाही तर त्यांच्यापेक्षा वरचढ मानतो. पश्चिम समाजासह सगळ्याच समाजात महिलांबद्दल पक्षपाती व्यवहार केला जातो. हा विचार बदलण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदी