शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

द्वेष करणा-यांनाही मी आवडू लागली तर तो माझा अपमान - अरुंधती रॉय

By admin | Updated: May 23, 2017 11:41 IST

अरुंधती रॉय यांनी परेश रावल यांच्या ट्विटला उत्तर देताना आपल्याला अशा टीकेमुळे फरक पडत नाही असं सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट केल्यानंतर मंगळवारी सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच गाजला. अरुंधती रॉय यांनी परेश रावल यांच्या ट्विटला उत्तर देताना आपल्याला अशा टीकेमुळे फरक पडत नाही असं सांगितलं आहे. जर अशा लोकांना मी आवडू लागली तर तो माझा अपमान असेल असा टोलाही त्यांनी यावेळी मारला. 
 
अरुंधती रॉय यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितलं आहे की, "मी एखाद्या विषयावर आपलं मत मांडत आहे. त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. तुमच्यासाठी प्रत्येकजण उभा राहून टाळ्या वाजवेल अशी अपेक्षा तुम्ही करु शकत नाही". 
ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला. त्या अधिका-याने युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होते असे टि्वट परेश रावल यांनी केले होते. 
 
अरुंधती रॉय आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आल्या आहेत. "विरोधामुळे मला काही फरक पडत नाही. माझ्या समर्थकांची संख्या जास्त आहे. मी जेव्हा पंजाबमध्ये जाते तेव्हा हजारो लोक माझं समर्थन करतात. ओडिशातही अशीच परिस्थिती आहे", असं अरुंधती रॉय बोलल्या आहेत. "जर नकारामुळे मला वाईट वाटतं असं लोकांना वाटत असेल तर त्यांनी विचार करण्याची गरज आहे. अशा लोकांना माझं काम आवडत असेल तर तो माझा अपमान असेल", असंही त्या बोलल्या आहेत.
 
परेश रावल यांनी महिन्याभरापूर्वीच्या या घटनेवर आता का भाष्य केलेय ? ते कळायला आधार नाहीय. पण परेश रावल यांच्या विधानाने काँग्रेसच्या हाती आयते कोलीत दिले आहे. परेश रावल हे अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अरुंधती रॉय या लेखिका असण्याबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. 
 
काश्मीरमधील मानवी हक्कांबद्दल त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या भूमिकेवर अनेकांना आक्षेप आहे. 1997 साली अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंगस या कादंबरीला बुकर पारितोषिक मिळाले आणि हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले. काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी युवकाला जीपला बांधल्याचा व्हिडीओ आणि फोटो टि्वट करुन काश्मीरमधली दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला होता.