शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:39 IST

दरम्यान, भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार यांचे समर्थन केले आहे. "नियुक्ती पत्र घेताना चेहरा दाखवू नये का? हा काही इस्लामिक देश नाही. नितीश कुमार यांनी पालकाची भूमिका बजावली," असे म्हणत, त्या महिलेने नोकरी सोडावी किंवा 'जहन्नुम'मध्ये जावे, असे वादग्रस्त विधान केले." 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमादरम्यान एका मुस्लीम महिला डॉक्टरचा हिजाब खेचला. या घटनेनंतर, देशभरातून संताप व्यक्त होत आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत, नितीश कुमार यांनी संबंधित डॉक्टरची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण? मुख्यमंत्री सचिवालयात आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे वाटली जात होती. यावेळी एका मुस्लीम महिला डॉक्टरला पत्र देताना नितीश कुमार यांनी तिचा हिजाब खेचून तो बाजूला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर संबंधित महिला डॉक्टरने सरकारी सेवेत रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले उमर अब्दुल्ला -'एएनआय'शी बोलताना उमर अब्दुल्ला म्हणाले, "एक सेकंदासाठी सोडून द्या की, ती एक मुस्लीम महिला होती, हिजाब होता. केवळ एख्या महिलेवर हात उचलणे अथवा तिच्या कपड्याला स्पर्श करणे हे योग्य आहे का? आपण असे केले असते, मी तर केले नसते, तर मग त्यांना महिलेच्या कपड्याला स्पर्ष करण्याची काय आवश्यकता होती? यानंतर एखाद्या मुस्लीम महिलेचा हिजाब अशा पद्धतीने खेचणे. 

उमर पुढे म्हणाले, आज मी वाचले की, ती महिला डॉक्टर आपली ऑर्डरच घेऊ इच्छित नाही. ती म्हणते की, आता ती नोकरीवरच रुजू होणार नाही. नीतीश कुमारांना आपल्या चुकीची जाणीव व्हायला हवी. त्या डॉक्टरला पुन्हा बोलावून तिची माफी मागायला हवी आणि ती नोकरी करेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

उमर अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा -  "एखाद्या महिलेच्या कपड्यांना हात लावणे किंवा त्यांच्या मर्जीविरुद्ध तो ओढणे हे कोणत्या संस्कृतीत बसते? जर हाच प्रकार राजस्थान किंवा हरियाणामध्ये एखाद्या हिंदू महिलेच्या घुंघटाबाबत झाला असता आणि तो एखाद्या मुस्लीम नेत्याने केला असता, तर भाजपने अशीच भूमिका घेतली असती का?"

दरम्यान, भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार यांचे समर्थन केले आहे. "नियुक्ती पत्र घेताना चेहरा दाखवू नये का? हा काही इस्लामिक देश नाही. नितीश कुमार यांनी पालकाची भूमिका बजावली," असे म्हणत, त्या महिलेने नोकरी सोडावी किंवा 'जहन्नुम'मध्ये जावे, असे वादग्रस्त विधान केले." 

गिरीराज सिंह यांच्या विधानावर बोलताना अब्दुल्ला यांनी जोरदार टीका केली, "जर, असेच हरियाणा अथवा राजस्थानात एखाद्या हिंदू महिलेचे 'घूंघट' असते आणि ते मी खेचले असते तर, भाजप वाले असेच बोलले असते का? जर एख्याद्या मुस्लीम नेत्याने एखाद्या हिंदू महिलेचे 'घुंघट' खेचले असते, तर किती गदारोळ झाला असता. डॉक्टर महिला मुस्लीम होती, यामुळेच भाजपची प्रतिक्रिया वेगळी आहे," असे उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar's hijab incident sparks outrage; Omar Abdullah demands apology.

Web Summary : Nitish Kumar faces criticism for pulling a Muslim doctor's hijab. Omar Abdullah condemned the act, demanding an apology and highlighting potential bias if a similar act targeted a Hindu woman. BJP's Giriraj Singh defended Kumar, sparking further controversy.
टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाNitish Kumarनितीश कुमार