मी नसतो तर अखिलेश-डिंपलचं लग्न झालं नसतं

By Admin | Updated: October 27, 2016 19:33 IST2016-10-27T19:05:12+5:302016-10-27T19:33:30+5:30

समाजवादी पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर अखेर अमर सिंग यांनी मौन सोडलं आहे.अखिलेशनी मला दलाल म्हटल्याचं अतिव दुःख वाटतं. जेव्हा सगळा परिवार अखिलेशच्या लग्नाच्या विरोधात होता

If I am not, Akhilesh and Dimple could not get married | मी नसतो तर अखिलेश-डिंपलचं लग्न झालं नसतं

मी नसतो तर अखिलेश-डिंपलचं लग्न झालं नसतं

>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 27 - समाजवादी पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर अखेर अमर सिंग यांनी मौन सोडलं आहे. 'दरवेळेस माझ्यावरच आरोप लावले जातात , रामगोपाल यादव यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की मला दोन मुली आहेत आणि रामगोपाल यांच्या धमकीमुळे मला आता माझ्या मुलींच्या सुरक्षेविषयी भिती वाटते. जर माझ्यासोबत काही बरं-वाईट झालं तर त्यासाठी रामगोपाल हे जबाबदार असतील' असं गंभीर विधान त्यांनी केलं.    
ज्यावेळी शिवपाल यांना हटवून अखिलेश यादव यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं त्यावेळीही मलाच जबाबदार धरण्यात आलं होतं' असंही अमर सिंग म्हणाले.  
(72 तासांचा यादवी कलह पुर्वनियोजित?)
(यूपीत राजकीय हालचालींना वेग, अखिलेश यांनी घेतली राज्यपाल राम नाईकांची भेट)
अखिलेश यादव यांनी मला दलाल म्हटल्याचं अतिव दुःख वाटतं. जेव्हा सगळा परिवार अखिलेशच्या लग्नाच्या विरोधात होता त्यावेळी केवळ मी एकट्याने अखिलेश यांची साथ सोडली नव्हती. अखिलेशच्या लग्नातला असा एकही फोटो सापडणार नाही ज्यामध्ये हा दलाल नाही असा चिमटाही त्यांनी अखिलेश यांना काढला.

Web Title: If I am not, Akhilesh and Dimple could not get married