शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

देशात आज निवडणूक झाली तर...; भाजपला किती जागा, काँग्रेसचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 06:28 IST

पुन्हा दिसणार मोदी मॅजिक : भाजपला २९२ ते ३३८, तर काँग्रेसला मिळतील १०६ ते १४४ जागा

नवी दिल्ली : आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणाचे वर्चस्व असेल? भाजप की काँग्रेस की विरोधी एकजूट? बाजी कोण मारणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे टाइम्स नाऊ नवभारत आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणातून समोर आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा जिंकणार असल्याचे सर्वेक्षणात दिसून येत आहे. मोदी सरकार २.० च्या कामकाजावर किती समाधानी आहेत, असा सवाल केला असता ५१ टक्के लोकांनी पूर्णपणे समाधानी असल्याचे सांगितले. १६ टक्के लोकांनी बऱ्याच प्रमाणात, तर १२ टक्के लोकांनी सरासरी समाधानी असल्याचे सांगितले. २१ टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे सांगितले. 

लोकांना वाटते, भ्रष्टाचारी झाले सैरभैर भ्रष्टाचारावरील कारवाईवरून जे राजकारण होत आहे त्याकडे कसे पाहता, असा सवाल करण्यात आला तेव्हा ३० टक्के लोकांनी सांगितले की, हे अर्थ नसलेले राजकारण आहे. ३२ टक्के लोकांना वाटते की, भ्रष्टाचारी लोक सैरभैर झाले आहेत. १४ टक्के लोकांना वाटते की, हा राजकीय दबावाचा प्रयत्न आहे. २४ टक्के लोकांनी सांगितले की, यावर बोलू इच्छित नाही.

आज निवडणूक झाली तर कोणाला किती जागा?भाजप    २९२ ते ३३८ काँग्रेस    १०६ ते १४४टीएमसी    २० ते २२ इतर     ६६ ते ९६ 

भारत जोडो यात्रेचा राहुल गांधी यांना फायदा?राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या राजकीय आकलनात फरक पडला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. ३० टक्के लोकांनी सांगितले की, यामुळे फरक पडला आहे. तर, २२ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, जे त्यांनी कमविले ते लंडन दौऱ्यात गमविले. २५ टक्के लोकांना वाटते की, राहुल गांधी योग्य मार्गावर आहेत.

विरोधकांचा चेहरा कोण?राहुल गांधी    २९%ममता बॅनर्जी    १३%केजरीवाल    १९%केसीआर    ७%नितीशकुमार    ८%इतर कोणी    २४%

लोकप्रिय चेहरा कोणाचा?

नरेंद्र मोदी६४%

राहुल गांधी१३%

नितीशकुमार६%

केसीआर५%

अरविंद केजरीवाल१२ %

२०२४ मध्ये भाजपला किती जागा?३००+ जागा मिळतील        ४२% ३०० जागा जिंकणे कठीण     २६%निवडणुकीवेळी स्पष्ट होईल     १९% काही सांगू शकत नाही        १३% 

सरकारचे मोठे यश काय?कोरोनाचा सामना     २६% कलम ३७० हटवणे         ९% राम मंदिराचा मुद्दा         २९% जनकल्याणाच्या योजना         १७% भ्रष्टाचाराविरुद्धची     १९% 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूक