शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आलो तर राम मंदिरासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू; निवडणुकीआधी काँग्रेसचा 'राम'बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 19:59 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा राम राग

डेहराडून: काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं काँग्रेसचे महसचिव आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी म्हटलं. भाजपाराम मंदिराचं राजकारण करत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. भाजपाला फक्त फक्त नरेंद्र मोदीचं राष्ट्रवादी वाटतात, असंही रावत म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 'अयोध्या प्रकरणावर मी आधीदेखील बोललो आहे. आमचा पक्ष सत्तेत आल्यास राम मंदिर उभारणीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु. हीच काँग्रेसची भावना आणि भूमिकादेखील आहे,' असं रावत म्हणाले. काँग्रेसनं सत्तेवर असताना दोनवेळा राम मंदिरासाठी गांभीर्यानं प्रयत्न केले. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही ही गोष्ट आपल्यासमोर स्वीकारली होती, असा दावा त्यांनी केला. भाजपा राम मंदिराच्या मुद्द्याचा केवळ राजकारणासाठी वापर करत असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन रावत यांनी भाजपावर टीका केली. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच राष्ट्रवादी आहेत असं भाजपाला वाटतं, असं रावत यांनी म्हटलं. 'फक्त मोदीच कसे काय राष्ट्रवादी असू शकतात. देशातील प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादी आहे. मी राष्ट्रवादी आहे, तुम्हीही राष्ट्रवादी आहात. देशातील जनता शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभी आहे,' असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तराखंड सरकारवर सडकून टीका केली. 'राज्य सरकारचा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही. केवळ दीनदयाळ उपाध्याय, नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित काही जुने प्रस्ताव आहेत,' अशा शब्दांमध्ये रावत उत्तराखंड सरकारवर बरसले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९