शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बनल्यास शेतकऱ्यांना दहा दिवसांत देऊ कर्जमाफी, राहुल गांधींचे वचन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 16:25 IST

ज्या दिवशी काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे वचन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले...

मंदसौर  - ज्या दिवशी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे वचन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदसौर येथे शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करताना दिले.   मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या पहिल्या स्मृतिदिनी राहुल गांधी उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शेतकऱ्यांना न्याय आणि कर्जमाफीसारख्या विषयांना हात घालत या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले. मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोड रुपयांचे कर्ज माफ होते. मात्र शेतकऱ्यांना एका रुपयाचीही माफी मिळत नाही, अशी टीका करत राहुल गांधींनी ज्या दिवशी राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे वचन दिले.शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मंदसौर येथे झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना आपले सरकार आल्यानंतर दहा दिवसांच्या आत न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.  शिवराज सरकारमध्ये शेतकऱ्यांना बाजारात चेक मिळतो आणि बँकेत त्यांच्याकडून लाच घेतली जाते. मात्र काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यांना थेट बाजारातच पैसे दिले जातील. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून स्थानिकांना रोजगार दिला जाईल,  असे राहुल गांधींनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना सत्तेवर येताना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीPoliticsराजकारण