शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सायकल गेली तर मोटारसायकल!

By admin | Updated: January 4, 2017 02:36 IST

उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षातील मुलायम सिंग आणि अखिलेश या यादव पिता-पुत्रांनी पक्षाच्या ‘सायकल’या निवडणुक चिन्हावर दावा केला असला तरी या वादाचा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षातील मुलायम सिंग आणि अखिलेश या यादव पिता-पुत्रांनी पक्षाच्या ‘सायकल’या निवडणुक चिन्हावर दावा केला असला तरी या वादाचा फैसला होईपर्यंत ‘सायकल‘ऐवजी ‘मोटारसायकल’ हे निवडणूक चिन्ह द्यावे, अशी मागणी अखिलेश गट करणार असल्याचे विश्नसनीय सूत्रांकडून समजते.मुलायम सिंग यांनी सोमवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन ‘सायकल’वर आपला दावा केला. अखिलेशची पक्षाध्यक्षपदी निवड झालेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकच बेकायदा व पक्षघटनेच्या विरोधात होती. पक्षात फूट पडलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत सपाचे राखीव निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळायला हवे, यावर मुलायम सिंग यांचा भर होता.लगोलग मंगळवारी अखिलेश गटातर्फे त्यांचे विश्वासू राम गोपाल यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांची भेट घेऊन ‘सायकल’वर प्रतिदावा केला. के. पी. नंदा, नरेश अगरवाल, अभिषेक मिश्रा आणि अक्षय यादव आदी नेते त्यांच्यासोबत होते. पक्षाचे ९0 टक्के संसद सदस्य व आमदार हे अखिलेश यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा गट हाच खरा समाजवादी पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे राखीव निवडणुक चिन्ह आम्हालाच मिळायला हवे, असे झैदी यांना सांगितल्याचे राम गोपाल यांनी पत्रकारांना सांगितले.निवडणूक आयोगास या वादाचा निर्णय समाजवादी पक्षाच्या घटनेचा अभ्यास करून किंवा दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन घेऊन, अशा दोन्ही प्रकारे करता येईल. उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना त्याआधी कदाचित ‘सायकल’चा अंतिम फैसला न होण्याचीही शक्यता आहे. तसे झाले तर वादग्रस्त निवडणूक चिन्ह गोठवून भांडणाऱ्या दोन्ही गटांना हंगामी स्वरूपात स्वतंत्रपणे नवे चिन्ह देण्याचे यापूर्वीचे पायंडे आहेत.सूत्रांनुसार ही शक्यता लक्षात घेऊनच अखिलेश गटाने ‘सायकल’ गेली तर ‘मोटारसायकल’ मागण्याचे ठरविले आहे. सायकलहून मोटारसायकल हे अधिक वेगवान व आधुनिक वाहन असल्याने त्याद्वारे पक्षाचे काळानुरूप बदललेले नवे रूपडे मतदारांपुढे मांडणे अधिक फायद्याचे ठरेल, असे या मागचे गणित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)नितिशकुमारांचा कानमंत्र- बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार हे या यादवीत अखिलेशच्या बाजूने उभे राहण्याची चिन्हे आहेत. मध्यंतरी त्यांनी अखिलेशचे तोंडभरून कौतुकही केले होते. - समाजवादी जातकुळीतील पक्षांची मोट बांधून स्थापन झालेल्या महाआघाडीला ऐनवेळी टांग मारल्याने नितिश कुमार व राजदचे प्रमुख लालुप्रसाद यांचा मुलायम सिंग यांच्यावर मनातून राग आहेच.- निवडणूक जिंकण्यासाठी काही तरी वेगळे करण्याचा सल्ला देताना नितिश यांनी अखिलेशना बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशातही दारुबंदी करण्याचा कानमंत्र दिला असल्याचेही समजते.- अखिलेश यादव यांनी मंगळवारी आपले वडील व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची त्यांच्या येथील निवासस्थानी भेट घेतली. - पक्षाचे नेतृत्व कोणी करावे यावरून मतभेद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली असली तरी अखिलेश यादव यांच्या गटाने त्या बातम्या अतिरंजित असल्याचे म्हटले.