शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:24 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत तीन विधेयके मांडली. यामध्ये पाच वर्षे किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास ३० दिवसांसाठी अटक किंवा ताब्यात घेतल्यानंतर मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे, असा एक प्रस्ताव आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत तीन विधेयके मांडली. जर एखाद्या विद्यमान मंत्री, मुख्यमंत्री किंवा अगदी पंतप्रधानांना पाच वर्षे किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाच्या शिक्षेच्या गुन्ह्यासाठी सलग ३० दिवस अटक केली किंवा ताब्यात ठेवले तर त्यांना एका महिन्याच्या आत त्यांचे पद सोडावे लागणार आहे, असे या विधेयकांमध्ये प्रस्तावित करण्यात आले. दरम्यान, आता विधेयकावरुन लोकसभेत गदारोळ सुरू आहे.

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली

दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विधेयकाला विरोध केला, त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. ओवैसी यांनी या विधेयकांना विरोध करत म्हटले की, "हे अधिकारांच्या पृथक्करणाचे उल्लंघन करते. हे विधेयक निवडून न आलेल्या लोकांना जल्लादची भूमिका बजावण्यास सक्षम करेल, असा आरोप त्यांनी केला.  या विधेयकातील तरतुदी सरकारांना अस्थिर करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. हे विधेयक म्हणजे गेस्टापो निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे, लोकसभेत विरोधकांनी गदारोळ सुरू केला यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले आहे. 

विरोधकांकडून जोरदार गोंधळ

विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर, सभागृहात विरोधकांकडून जोरदार गोंधळ झाला. दरम्यान, सभागृहाचे कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशांचे सरकार (सुधारणा) विधेयक. ही तिन्ही विधेयके पूर्णपणे नवीन कायदेशीर चौकट प्रस्तावित करतात. बडतर्फ मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांना कोठडीतून मुक्त झाल्यानंतर पुन्हा नियुक्त केले जाऊ शकते, असेही या विधेयकात म्हटले आहे .

टॅग्स :lok sabhaलोकसभाAmit Shahअमित शाह