शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुणी नाव विचारलं तर रंगा-बिल्ला आणि पत्ता 7 रेसकोर्स सांगा! एनआरसीवरून अरुंधती रॉय यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 19:59 IST

आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अरुंधती रॉय उपस्थित होत्या.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेला सीएए कायदा आणि प्रस्तावित एनआरसीच्या मुद्द्यावरून सामाजिका कार्यकर्त्या आणि लेखिका अरुंधती रॉय यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.  देशातील डिटेंशन कॅम्पबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. एनपीआरसुद्धा एनआरसीचाच भाग आहे. त्यामुळे जेव्हा एनपीआरसाठी सरकारी कर्मचारी माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचे नाव रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला असल्याचे सांगा. तसेच घराचा पत्ता देण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता द्या, असा सल्ला अरुंधती रॉय यांवी दिला आहे. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अरुंधती रॉय उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत अभिनेते जिशान अय्यूब आणि अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमारसुद्धा उपस्थित होते.  यावेळी अरुंधती रॉय म्हणाल्या की, ''देशातील डिटेंशन कॅम्पबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा याबाबत देशासमोर चुकीची माहिती मांडली आहे. जेव्हा महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी सरकारविरोधात आवाज उठवतात तेव्हा त्यांना शहरी नक्षलवादी म्हणून हिणवले जाते.'' ''एनपीआरसुद्धा एनआरसीचाच भाग आहे. त्यामुळे जेव्हा एनपीआरसाठी सरकारी कर्मचारी माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचे नाव रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला असल्याचे सांगा. तसेच घराचा पत्ता देण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता लिहून द्या,'' सल्लाही अरुंधती रॉय यांनी दिला. ''त्तर भारतात जेव्हा जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते. तेव्हा तेथील माता भगिनी आपल्या मुलांच्या आधी आपली कागदपत्रे वाचवतात. कारण त्यांना माहिती आहे की जर कागदपत्रे वाहून गेली तर त्यांचे येथे राहणेसुद्धा कठीण होऊन जाईल,''असा टोलाही अरुंधती रॉय यांनी लगावला. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण