शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'देवी अन्नपूर्णा'ची १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मूर्ती कॅनडाहून परत आणणार; मोदींची घोषणा

By मोरेश्वर येरम | Updated: November 29, 2020 15:41 IST

देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात येण्यासोबतच एक योगायोग असा की काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा आठवडा साजरा करण्यात आला. संस्कृतीप्रेमींसाी जुन्या काळात जाण्यासाठी आणि इतिहास समजून घेण्यासाठी ही एक संधी असते.

ठळक मुद्दे१०० वर्ष जुनी देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात परत येणारपंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये दिली खूशखबरवाराणसी येथून चोरीला गेली होती प्राचीन मूर्ती

नवी दिल्लीभारतीय परंपरेचा वारसा असलेली १०० वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतात परत आणणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमात दिली. आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी ही मूर्ती चोरुन कॅनडाला नेली होती. 

"मी आज सर्वांना एक आनंदाची बातमी देत आहे. देवी अन्नपूर्णाची एक प्राचीन मूर्ती कॅनडातून भारतात परत येत आहे, हे ऐकून प्रत्येक भारतीयाला गर्व होईल. ही मूर्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी १९१३ रोजी वाराणसीतील एका मंदिरातून चोरुन देशाबाहेर नेण्यात आली होती. ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आणि कॅनडा सरकारचे मी आभार मानतो'', असं मोदी 'मन की बात' कार्यक्रमात म्हणाले.

मोदींनी यावेळी या मूर्तीचे महत्व देखील सांगितले. ''देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीचा काशी शहराशी खूप जुना संबंध आहे. त्यामुळे ही मूर्ती भारतात परत येणं आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. माता अन्नपूर्णा मूर्तीसह आपल्या अनेक प्राचीन मूर्ती आणि ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा शिकार झाला आहे. चोरांच्या या टोळ्या प्राचीन वस्तूंची मोठ्या किंमतीत विक्री करतात. पण भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आजवर अशा अनेक मूर्ती आणि कलाकृता पुन्हा देशात आणण्यात यश आले आहे.", असंही मोदी म्हणाले. 

''देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात येण्यासोबतच एक योगायोग असा की काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा आठवडा साजरा करण्यात आला. संस्कृतीप्रेमींसाी जुन्या काळात जाण्यासाठी आणि इतिहास समजून घेण्यासाठी ही एक संधी असते. कोरोनाच्या काळात आपण यावेळी वेगळ्या पद्धतीनं हा आठवडा साजरा केला. शेवटी संकटाच्या काळात संस्कृती कामी येते. संस्कृती तुम्हाला एक भावनिक प्रेरणा देण्याचं काम करत असते'', असं मोदी म्हणाले. 

अन्नपूर्णा मूर्तीचा हा १८ व्या शतकातील ठेवा रेजिना विद्यापीठाचे कुलगुरू थॉमस चेस यांच्या हस्ते भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार आणि सीमा सेवा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. अन्नपूर्णाची ही मूर्ती मूळची वाराणसी येथील असून ती कॅनडाच्या सुप्रसिद्ध मॅकेन्झी आर्ट गॅलरीमध्ये होती. 

भारतीय उच्चायुक्तलाच्या माहितीनुसार, अन्नपूर्णा देवीची मूर्ती संशयास्पद परिस्थितीत अधिग्रहित केली गेल्याचं कॅनडाच्या युनिर्व्हसीटीने मान्य केलं आहे. त्यामुळे सध्याच्या नैतिक अधिग्रहणाच्या तत्वांमध्ये असे अधिग्रहण योग्य ठरत नाही. या मुद्द्यावरुन कॅनडाने भारताला सहकार्य करत ही मूर्ती परत देण्याचे मान्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा