शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

काँग्रेस पक्षाची मानसिकता अजूनही आणीबाणीचीच , पंतप्रधान मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:32 IST

काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेतच वावरत आहे. निवडणुकीतील पराभव पचनी न पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले आहे.

मुंबई : काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेतच वावरत आहे. निवडणुकीतील पराभव पचनी न पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले आहे. जेव्हा-जेव्हा गांधी घराण्याला सत्ता जाण्याची भीती वाटते, तेव्हा-तेव्हा भीतीचे वातावरण असल्याची हाकाटी पिटली जाते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढविला.आणीबाणीला ४३ वर्षे झाल्यानिमित्त कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आणीबाणी हे काँग्रेसचे पाप आहे. एका कुटुंबाच्या स्वार्थासाठी राज्यघटनेचा दुरुपयोग करून, आणीबाणी लादण्यात आली. सत्तेपोटी स्वत:च्या पक्षाचे तुकडे करून देशाचा कैदखाना करण्यात आला. आणीबाणीनंतरही काँग्रेसची मानसिकता बदलली नाही. काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. एकाच कुटुंबाची सत्ता हेच काँग्रेसचे धोरण आहे. सत्ता गेल्याचे दु:ख काँग्रेस पचवू शकली नाही. त्यामुळेच पद्धतशीरपणे सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे.आणीबाणीनंतर लोकांनीच लोकशाही जगवली. लोकशाहीवरील निष्ठा मजबूत राहावी, यासाठी आणीबाणीचा अध्याय विसरता कामा नये. आजच्या व पुढच्या पिढीला जागरूक करण्यासाठी आणीबाणीतील दिवसांचे स्मरण आवश्यक असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आणीबाणीच्या विरोधात असंख्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या लढ्याचा विजय हा लोकशाही व भारतीय राज्यघटनेचा विजय आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हजर होते.कुलदीप नायर यांना सलामपत्रकार कुलदीप नायर यांनी आणीबाणीला जोरदार विरोध केला होता, याची आठवण सांगून मोदी म्हणाले की, आज नायर हे भाजपाचे कट्टर विरोधक आहेत. तरीही मला त्यांच्याविषयी आदर आहे. त्यांना माझा सलाम!एकाधिकारशहा पंतप्रधान व उद्दाम सरकारमुळेच राज्यघटना धोक्यातदेशात आणीबाणी लादण्यावरून काँग्रेसवर लोकशाही व राज्यघटनेच्या गळचेपीचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या राजवटीतच घटनात्मक लोकशाही संस्थांना पद्धतशीरपणे सुरुंग लावला जात आहे, असे खरमरीत प्रत्युत्तर काँग्रेसने मंगळवारी दिले.अपयश झाकण्यासाठी खटाटोप - पवारनरेंद्र मोदी यांना ४ वर्षांतील आपल्या अपयशावरून लक्ष हटविण्यासाठी तब्बल ४३ वर्षांनी आणीबाणीची आठवण होत आहे, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.देशाचे त्यांना काही नाहीभ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपल्याला कधी न्यायालयात उभे राहावे लागेल, जामीन घ्यावा लागेल, याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास न दाखविता सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केला गेला. आणीबाणी व महाभियोग ही काँग्रेसची मानसिकता आहे. काँग्रेसला देश, परंपरा, लोकशाही यांचे काहीच वाटत नाही.आणीबाणीच्या काळात प्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार यांना एका कार्यक्रमात गाण्यासाठी बोलाविण्यात आले होते. त्यांनी त्यास नकार दिल्यावर, त्यांची गाणी आकाशवाणीवरून ऐकविणेही बंद करण्यात आले. किशोर कुमार यांचा गुन्हा तरी काय होता? असा सवाल करतानाच 'आँधी' चित्रपटालाही त्या वेळी विरोध करण्यात आल्याची आठवण मोदी यांनी सांगितली.निष्कारण बागुलबुवाकेला जात आहेदेशात अनेक निवडणुका झाल्या, अनेक सरकारे आली, पण कोणी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत ४०० वरून ४० वर आल्यानंतर त्यांना निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा साक्षात्कार झाला. कर्नाटक निवडणुकीनंतर त्यांना ईव्हीएमची आठवण का झाली नाही, अशी कोपरखळीही मारून पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा मुस्लिमांना टार्गेट करेल, याचा बागुलबुवा काँग्रेसने उभा केला. दलित संकटात असल्याची भीती दाखविली जात आहे. ज्यांनी राज्यघटनेचे रक्षण केले नाही, तीच मंडळी आज मोदी घटनेला नख लावण्यात आल्याचा अपप्रचार करीत आहेत.